ज्येष्ठ एक नव्हे, तर दोन महिने,.....मराठी पंचांगात अधिक मास का येतो, जाणून घ्या.....

इमेज
  आजपासून पुरुषोत्तम मास अर्थात ज्येष्ठ अधिक मास सुरू !        सध्या ज्येष्ठ महिना सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ महिन्यात अधिक मास (पुरुषोत्तम मास) असेल, म्हणजेच ज्येष्ठ एक नव्हे, तर दोन महिने राहील. 16 मे पर्यंत ज्येष्ठ कृष्ण पक्ष राहील, त्यानंतर 17 मे पासून अधिक मास सुरू होईल, जो 15 जून पर्यंत चालेल. त्यानंतर ज्येष्ठ शुक्ल पक्ष सुरू होईल, जो 29 जून पर्यंत राहील. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, मुंडन, जानवे संस्कार यांसारख्या शुभ कार्यांसाठी मुहूर्त नसतात. अधिक मासात भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची विशेष पूजा केली जाते. या महिन्याला विष्णूंच्याच पुरुषोत्तम या नावानेही ओळखले जाते. या दिवसांमध्ये तीर्थस्नान, मंदिरांमध्ये दर्शन-पूजन, सत्संग, मंत्र जप, दान-पुण्य, पूजन इत्यादी शुभ कार्ये केली जातात. इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप इयर असते आणि हिंदी पंचांगमध्ये अधिक मास. लीप इयरमध्ये फक्त एक दिवस वाढतो, तर अधिक मासामुळे मराठी वर्षात पूर्ण एक महिना वाढतो. खरं तर, हे सौर वर्ष आणि चंद्र वर्ष यांच्यातील फरकामुळे होते. लीप वर्षात एक दिवस वाढतो..... इंग्रजी कॅलेंडर   पृथ्वीच्...

 शनिअमावस्येनिमित्त राक्षसभुवन दुमदुमले; एक लाख भाविकांनी घेतले दर्शन



गेवराई : राक्षसभुवन शनी महाराज देवस्थान येथे शनिअमावस्येनिमित्त शनिभक्तांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. राज्यातील विविध जिल्ह्यांसह परराज्यातून आलेल्या सुमारे एक लाख भाविकांनी दिवसभरात शनी महाराजांचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भगवान पुराणिक यांनी दिली.

शनिअमावस्येनिमित्त पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली होती. “जय शनीदेव”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. अनेक भाविकांनी तेल अभिषेक, पूजा-अर्चा, नवसपूर्ती तसेच विविध धार्मिक विधी करून शनी महाराजांचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची मोठी वर्दळ कायम होती.

यंदा तीव्र उष्णतेची लाट आणि कडक उन्हाळा असूनही भाविकांची श्रद्धा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून देवस्थान ट्रस्टतर्फे सकाळी व सायंकाळच्या वेळेत दर्शनासाठी येण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले होते. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन ट्रस्टकडून करण्यात आले होते.

भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्टतर्फे पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था, सावलीसाठी मंडप, वाहन पार्किंग तसेच दर्शन रांगांचे नियोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात स्वयंसेवक कार्यरत ठेवण्यात आले होते. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शनिअमावस्येनिमित्त राक्षसभुवन येथे भरलेल्या यात्रेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. फळे, पूजेचे साहित्य, प्रसाद तसेच खाद्यपदार्थांच्या दुकानांवर मोठी गर्दी झाली होती. दिवसभर भाविकांच्या गर्दीमुळे राक्षसभुवन परिसर पूर्णपणे दुमदुमून गेला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या