व्यापार पेठेच्या मुख्य रस्त्यावरच घटना घडल्याने काही काळ तणाव....
आमच्या मशिदीत नमाज पढण्यासाठी आलास तर खल्लास करून टाकू: धमकी देत एकाला बेदम मारहाण परळी वैजनाथ (प्रतिनिधी) "आमच्याविरुद्ध काम करतोस का ?तुला बघून घेऊ" असे म्हणत एका जणाला पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना परळी शहरातील अरुणोदय मार्केट येथील रस्त्यावर घडली. यापुढे आमच्या मशिदीत नमाज पढण्यासाठी आलास तर खल्लास करून टाकू अशी धमकी देत रस्त्यावरच हा राडा झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळी शहरातील अरुणोदय मार्केट समोरील रस्त्यावर रविवार दि.८ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता खाजगी वायरमन सय्यद खद्दुस सय्यद मंजूर वय ३७ वर्षे रा.पेठ मोहल्ला हे एका इलेक्ट्रिकल दुकानातून सामान खरेदी करून जात होते. त्यावेळी संगणमत करून त्याला रस्त्यात अडवून पाच जणांनी धमक्या देत मारहाण केली. "तु लई माजला आहेस", "तुला लई मस्ती आली आहे" तु आमचे विरोधात काम का केलेस असे म्हणुन शिवीगाळ सुरू केली. तसेच लोखंडी रॉड दगड आदींचा वापर करत पाच जणांनी या फिर्यादीला त्याच्या ...