जागतिक महिला दिनानिमित्त उत्साहात उपक्रम..

इमेज
  तिहेरी आनंदाचा महिला दिन स्कॉलर केजी स्कूलमध्ये साजरा स्वतःचा उत्कर्ष कसा करावा याचा संवाद साधणारा कार्यक्रम, पाककलेच्या कौशल्येला वाव देणारा आनंद नगरीचा कार्यक्रम आणि महिलांच्या आरोग्याला थोडासा हातभार लावणारा फ्री डेंटल चेकअप कॅम्प असा तिहेरी आनंदाचा महिला दिन स्कॉलर केजी स्कूलमध्ये उत्साहात साजरा झाला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सुरेखा बांगर तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ रुपाली फड आणि प्रा वंदना जगतकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ पद्धतीने व्यासपीठावर बसण्याची संधी सौ पूनम भुतडा यांना मिळाली. विद्येची देवता सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या शिक्षिका आणि फुटके परिवाराच्या वतीने करण्यात आले.  शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांनी आपल्या प्रास्ताविकात यावर्षी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या आनंद नगरी, फ्री डेंटल चेकअप कॅम्पचे आयोजन महिला दिनानिमित्ताने करताना आनंद होत असल्याचे सांगितले. डॉ सौ रूपाली फड यांनी महिलांनी कुटुंब सांभाळत असताना स्वतःच्या आरोग्याची क...

Live: Maharashtra budget.....

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंनी प्रस्तावित केलेली ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ मंजूर; अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांची घोषणा




मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रस्तावित केलेल्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजने’ला राज्य सरकारने मंजुरी दिली असून याबाबतची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली.

ग्रामीण भागात पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन तसेच इतर पशुधन आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील युवक, महिला आणि शेतकरी यांना पशुधन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक व तांत्रिक सहाय्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषीसमकक्ष दर्जा देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे पशुपालकांना शेतीप्रमाणे विविध शासकीय सवलती, कर्जसुविधा आणि पायाभूत सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू असलेल्या गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजने ची व्याप्ती वाढवून शेतमजुरांनाही या सुरक्षा कवचाखाली आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अपघाती प्रसंगी शेतमजुरांच्या कुटुंबालाही आर्थिक मदत मिळणार आहे.

याशिवाय महिला गोपालक, कुक्कुटपालक आणि शेळीपालक यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याची घोषणा करण्यात आली. तसेच मच्छीमारांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ अंतर्गत दरवर्षी मोठ्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी मांडलेल्या या उपक्रमांमुळे ग्रामीण भागात पशुधन उद्योगाला चालना मिळून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!