इमेज
  शेतातील पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने बैल ठार तर शेतकरी, बैल जखमी  दिंद्रुड : धारूर तालुक्यातील तेलगाव शिवारातील शेतकरी जयप्रकाश उत्तमलाल तोष्णीवाल यांच्या पांढरी नामक शेतात सालगडी बैलजोडीने पाळी घालत असताना पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने ताणाला चिटकून एक बैल जागीच ठार झाला तर शेतमजूर व एका बैलाचा प्राण वाचला असून दोघेही किरकोळ जखमी आहेत. तोष्णीवाल यांच्या शेतात असलेल्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारेला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने बैलाला करंट लागून बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरा बैल व सालगडी दिपक थोरात किरकोळ जखमी झाले आहेत. शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

व्यापार पेठेच्या मुख्य रस्त्यावरच घटना घडल्याने काही काळ तणाव....

आमच्या मशिदीत नमाज पढण्यासाठी आलास तर खल्लास करून टाकू: धमकी देत एकाला बेदम मारहाण



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

"आमच्याविरुद्ध काम करतोस का ?तुला बघून घेऊ" असे म्हणत एका जणाला पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना परळी शहरातील अरुणोदय मार्केट येथील रस्त्यावर घडली. यापुढे आमच्या मशिदीत नमाज पढण्यासाठी आलास तर खल्लास करून टाकू अशी धमकी देत रस्त्यावरच हा राडा झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळी शहरातील अरुणोदय मार्केट समोरील रस्त्यावर रविवार दि.८ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता खाजगी वायरमन सय्यद खद्दुस सय्यद मंजूर वय ३७ वर्षे रा.पेठ मोहल्ला हे एका इलेक्ट्रिकल दुकानातून सामान खरेदी करून जात होते. त्यावेळी संगणमत करून त्याला रस्त्यात अडवून पाच जणांनी धमक्या देत मारहाण केली. "तु लई माजला आहेस", "तुला लई मस्ती आली आहे" तु आमचे विरोधात काम का केलेस असे म्हणुन शिवीगाळ सुरू केली. तसेच लोखंडी रॉड दगड आदींचा वापर करत पाच जणांनी या फिर्यादीला त्याच्या उजव्या व डाव्या पायावर गंभीर मार दिला तसेच यापुढे "आमच्या मशिदीत नमाज पढण्यासाठी आलास तर तुला खल्लास करून टाकू" अशी जीवे मारण्याची धमकी दिली. बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरच अचानक सुरू झालेला हा राडा होता. यामुळे वर्दळीच्या रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. यामुळे काही काळ या ठिकाणच्या व्यापारपेठेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी १)शेख हशब मसरत २) शेख हफीज इकबाल ३) शेख शौफुला ताजोदिन इकबाल सर्व रा.पेठ मोहला, परळी वै ५) शेख आलीम शेख सगीर रा.हबीबपुरा परळी वै या पाच जणांविरुद्ध परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि डी.डी.राठोड हे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या