पोस्ट्स

जागतिक महिला दिनानिमित्त उत्साहात उपक्रम..

इमेज
  तिहेरी आनंदाचा महिला दिन स्कॉलर केजी स्कूलमध्ये साजरा स्वतःचा उत्कर्ष कसा करावा याचा संवाद साधणारा कार्यक्रम, पाककलेच्या कौशल्येला वाव देणारा आनंद नगरीचा कार्यक्रम आणि महिलांच्या आरोग्याला थोडासा हातभार लावणारा फ्री डेंटल चेकअप कॅम्प असा तिहेरी आनंदाचा महिला दिन स्कॉलर केजी स्कूलमध्ये उत्साहात साजरा झाला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सुरेखा बांगर तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ रुपाली फड आणि प्रा वंदना जगतकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ पद्धतीने व्यासपीठावर बसण्याची संधी सौ पूनम भुतडा यांना मिळाली. विद्येची देवता सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या शिक्षिका आणि फुटके परिवाराच्या वतीने करण्यात आले.  शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांनी आपल्या प्रास्ताविकात यावर्षी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या आनंद नगरी, फ्री डेंटल चेकअप कॅम्पचे आयोजन महिला दिनानिमित्ताने करताना आनंद होत असल्याचे सांगितले. डॉ सौ रूपाली फड यांनी महिलांनी कुटुंब सांभाळत असताना स्वतःच्या आरोग्याची क...

LIVE: Maharashtra Budget 2026..

इमेज
‘गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान’ योजनेचा विस्तार; शेतमजुरांनाही मिळणार आर्थिक संरक्षण मुंबई : राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू असलेल्या ‘गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान’ योजनेची व्याप्ती वाढवून आता शेतमजुरांनाही या सुरक्षा कवचाखाली आणण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली. आतापर्यंत या योजनेचा लाभ प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मिळत होता. मात्र आता शेतमजूर वर्गालाही अपघाती मृत्यू किंवा गंभीर अपंगत्वाच्या प्रसंगी आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मोठ्या कष्टकरी वर्गाला सामाजिक सुरक्षेचा आधार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या योजनेच्या विस्तारासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांप्रमाणेच शेतमजुरांच्या कुटुंबालाही आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतमजूर कुटुंबांना अपघाती प्रसंगी मोठा दिलासा मिळणार असून सामाजिक सुरक्षेचे कवच अधिक व्यापक होणा...

LIVE: Maharashtra Budget 2026..

इमेज
  Maharashtra Budget 2026 : CM फडणवीसांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांना मिळणार दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आज (दि.०६) रोजी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मांडला जाणारा हा पहिलाच अर्थसंकल्प असून, फडणवीसांनी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांसह नवीन योजनांची घोषणा केली आहे. विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा देखील समावेश करण्यात येणार असल्याचं सांगितलं. याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, मत्स्यसंपदा योजना, ग्रामीण पशूधन उद्योजक योजना, बळीराजा शेतपाणंद रस्ते या चार नव्या योजनांची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, २०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर नेणार आहे. याकरिता २०३५ मध्ये राज्याचा अमृत महोत्सव, यासाठी काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा ही मेसेज सेवा सुरू केली जाणार. डिजिटल सेवांद्वारे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या ...

Live: Maharashtra budget.....

इमेज
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंनी प्रस्तावित केलेली ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ मंजूर; अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रस्तावित केलेल्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजने’ला राज्य सरकारने मंजुरी दिली असून याबाबतची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. ग्रामीण भागात पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन तसेच इतर पशुधन आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील युवक, महिला आणि शेतकरी यांना पशुधन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक व तांत्रिक सहाय्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषीसमकक्ष दर्जा देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे पशुपालकांना शेतीप्रमाणे विविध शासकीय सवलती, कर्जसुविधा आणि पायाभूत सुविधा मिळण्याचा मार्ग ...

LIVE: maharashtra Budget....

इमेज
अर्थसंकल्पात ग्रामीण विकासावर भर; पशुधन उद्योग, मत्स्यसंपदा आणि शेतमजुरांसाठी महत्त्वाचे निर्णय मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. ग्रामीण भागातील रोजगार वाढवणे, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायाला बळ देणे तसेच शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला. राज्यात ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या योजनेमुळे पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन यांसारख्या व्यवसायांना चालना मिळून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पशुधन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषीसमकक्ष दर्जा देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या क्षेत्रातील उद्योजकांना शेतीप्रमाणे विविध शासकीय सवलती, कर्जसुविधा आणि पायाभूत सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा सुमारे २५ टक्...

अत्यंत मनमिळावू आणि सामाजिक संवेदनशील व्यक्तिमत्व हरवले....

इमेज
परळीतील भाजप नेते, पत्रकार किरण धोंड यांच्या सुविद्य पत्नी सौ.कीर्ती धोंड यांचे निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी):       येथील भारतीय जनता पार्टीचे नेते तथा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शहराध्यक्ष  किरण धोंड यांच्या सुविद्य पत्नी सौ. कीर्ती किरण धोंड (वय ४२) यांचे आज, गुरुवार दि. ५ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने धोंड परिवारासह स्नेही, आप्तेष्ट, मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.       सौ. कीर्ती किरण धोंड यांनी अंगणवाडी शिक्षिका म्हणून परळीत काम केले. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. अत्यंत मनमिळावू, कुटुंबवत्सल आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून त्या सर्वपरिचित होत्या.सौ. कीर्ती धोंड यांनी अंगणवाडी शिक्षिका म्हणून सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या पश्चात पती, सासू आणि एक मुलगा असा  परिवार आहे. स्वतः च्या आजारपणातही जपले होते सामाजिक भान         सौ. कीर्ती धोंड या केवळ अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत नव्हत्या, तर त्यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला होता. २०२३ मध्ये त्यांनी शासकीय कर्कर...
इमेज
  परळी संचारच्या वतीने महिला दिनी होणार परळीतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव-अनंत कुलकर्णी परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- जागतिक महिला दिनानिमित्त परळी शहरात विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा सा.परळी संचारच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. परळी संचारचे संपादक अनंत शामराव कुलकर्णी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. परळीच्या सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, वैद्यकिय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या अकरा कर्तृत्ववान महिलांचा सा.परळी संचारच्या वतीने महिला दिनी येत्या रविवारी ८ मार्चला गौरव करण्यात येणार आहे. त्यात नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, डॉ.शालीनी बालासाहेब कराड, सौ.शर्मिला अशोक जैन, सौ.वर्षाराणी लक्ष्मणराव हाके, नगरसेविका सौ.अर्चना महेंद्र रोडे, सौ.सुमन लक्ष्मण वाकडे, श्रीमती दुर्गा  वैजनाथ दहातोंडे सौ.गौरी सुनील जोशी, कु.राधिका रामप्रसाद शर्मा, स्नेहा एकनाथ बनसोडे, जनाई महाराज कोकाटे आदी महिलांचा यानिमित्ताने गौरव करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शहरातील नाथ चित्...

लाळखुरकूत रोग प्रति बंधात्मक लसीकरण..

इमेज
  जिल्ह्यात पशुधनासाठी लाळखुरकूत उपलब्ध प्रतिबंधात्मक  लसीचा लाभ घ्यावा - अनिल बोर्डे गेवराई (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पशुधनास दर सहा महिन्यांनी लाळखुरकूत रोग प्रति बंधात्मक लसीकरण करण्यासाठी लस उपलब्ध झालेली आहे. जिल्ह्यात  लाळ खुरकूत प्रतिबंधात्मक लसीकरण फेरी क्रमांक ८ ही जिल्ह्यात दिनांक १३/२/२०२६ते २९/३/2०२६ राबविण्यात प्रारंभ झालेला आहे.    केंद्र पुरस्कृत पशु स्वास्थ रोग नियंत्रण समूह गट योजनेमधील राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण  कार्यक्रमांतर्गत लाळखुरकूत प्रतिबंधात्मक लस मोहीम दिनांक १३/२/२०२६ ते२९/३/२०२६ नुसार मोहीम फेरी क्रमांक ८ सुरू झालेली आहे.      बीड जिल्ह्यासाठी एकूण (५०५३००) एवढ्या  प्रतिबंधात्मक लसी प्राप्त झालेल्या आहेत. लसीचा तालुकास्तरावर पुरवठा करण्यात आलेला आहे असे समजते .तरी पशुधन चालकाने  किंवा शेतकरी ग्राहकाने लस घेण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तात्काळ संपर्क करणे आवश्यक आहे.  त्यासाठी जनावराच्या कानात बिल्ला असल्याची व संबंधित पशुचालकाच्या भ्रमणध्वनी द्वारे पडताळणी करण्यात येणार आहे.  ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!