लाळखुरकूत रोग प्रति बंधात्मक लसीकरण..

 जिल्ह्यात पशुधनासाठी लाळखुरकूत उपलब्ध प्रतिबंधात्मक  लसीचा लाभ घ्यावा - अनिल बोर्डे




गेवराई (प्रतिनिधी) जिल्ह्यातील पशुधनास दर सहा महिन्यांनी लाळखुरकूत रोग प्रति बंधात्मक लसीकरण करण्यासाठी लस उपलब्ध झालेली आहे. जिल्ह्यात  लाळ खुरकूत प्रतिबंधात्मक लसीकरण फेरी क्रमांक ८ ही जिल्ह्यात दिनांक १३/२/२०२६ते २९/३/2०२६ राबविण्यात प्रारंभ झालेला आहे. 

  केंद्र पुरस्कृत पशु स्वास्थ रोग नियंत्रण समूह गट योजनेमधील राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण  कार्यक्रमांतर्गत लाळखुरकूत प्रतिबंधात्मक लस मोहीम दिनांक १३/२/२०२६ ते२९/३/२०२६ नुसार मोहीम फेरी क्रमांक ८ सुरू झालेली आहे. 

    बीड जिल्ह्यासाठी एकूण (५०५३००) एवढ्या  प्रतिबंधात्मक लसी प्राप्त झालेल्या आहेत. लसीचा तालुकास्तरावर पुरवठा करण्यात आलेला आहे असे समजते .तरी पशुधन चालकाने  किंवा शेतकरी ग्राहकाने लस घेण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तात्काळ संपर्क करणे आवश्यक आहे.  त्यासाठी जनावराच्या कानात बिल्ला असल्याची व संबंधित पशुचालकाच्या भ्रमणध्वनी द्वारे पडताळणी करण्यात येणार आहे. 

      तरी सर्व शेतकरी ग्राहक व पशु मालकाने रोग प्रतिबंधात्मक लसीचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाभ घेणे अत्यंत आवश्यक आहे असे आवाहन बीड ग्राहक पंचायत उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक मार्गदर्शन केंद्रप्रमुख अनिल बोर्डे यांनी या पत्राद्वारे केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...