इमेज
  शेतातील पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने बैल ठार तर शेतकरी, बैल जखमी  दिंद्रुड : धारूर तालुक्यातील तेलगाव शिवारातील शेतकरी जयप्रकाश उत्तमलाल तोष्णीवाल यांच्या पांढरी नामक शेतात सालगडी बैलजोडीने पाळी घालत असताना पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने ताणाला चिटकून एक बैल जागीच ठार झाला तर शेतमजूर व एका बैलाचा प्राण वाचला असून दोघेही किरकोळ जखमी आहेत. तोष्णीवाल यांच्या शेतात असलेल्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारेला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने बैलाला करंट लागून बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरा बैल व सालगडी दिपक थोरात किरकोळ जखमी झाले आहेत. शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त उत्साहात उपक्रम..

 तिहेरी आनंदाचा महिला दिन स्कॉलर केजी स्कूलमध्ये साजरा



स्वतःचा उत्कर्ष कसा करावा याचा संवाद साधणारा कार्यक्रम, पाककलेच्या कौशल्येला वाव देणारा आनंद नगरीचा कार्यक्रम आणि महिलांच्या आरोग्याला थोडासा हातभार लावणारा फ्री डेंटल चेकअप कॅम्प असा तिहेरी आनंदाचा महिला दिन स्कॉलर केजी स्कूलमध्ये उत्साहात साजरा झाला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सुरेखा बांगर तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ रुपाली फड आणि प्रा वंदना जगतकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ पद्धतीने व्यासपीठावर बसण्याची संधी सौ पूनम भुतडा यांना मिळाली. विद्येची देवता सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या शिक्षिका आणि फुटके परिवाराच्या वतीने करण्यात आले. 

शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांनी आपल्या प्रास्ताविकात यावर्षी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या आनंद नगरी, फ्री डेंटल चेकअप कॅम्पचे आयोजन महिला दिनानिमित्ताने करताना आनंद होत असल्याचे सांगितले. डॉ सौ रूपाली फड यांनी महिलांनी कुटुंब सांभाळत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची सुचित केले. डॉ सौ सुरेखा बांगर यांनी कर्तुत्ववान स्त्रियांची आठवण करून देत आपण कसे वागावे याचे उत्तम उदाहरण महिलांना दिले. त्यांचा हसत खेळत झालेला हा संवाद महिलांना खूप आवडला. 

प्रा सौ वंदना जगतकर यांनी या आनंदनगरीचे परीक्षण केले. आपल्या मनोगतात त्यांनी सकस पौष्टिक आहाराचे महत्वही महिलांना सांगितले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते आनंदनगरीचे तसेच फ्री डेंटल चेकअप कॅम्पचे उद्घाटन झाले आणि आनंद सोहळ्यास सुरुवात झाली. आरोग्यास पोषक आणि जिभेला सुखाविल अशा अनेक खमंग पदार्थांची मेजवानी उपस्थित महिलांना या ठिकाणी मिळाली. सुमारे दोन तासापेक्षा अधिक वेळ चाललेल्या या आनंदनगरीचा आस्वाद परिसरातील अनेक महिला, पुरुष तसेच बालगोपाळांनी घेतला. 

प्रमुख अतिथींचे तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महिलांचे अनोख्या पद्धतीने स्कॉलर केजी स्कूलच्या स्टाफने स्वागत केले. मंडप, रांगोळी, आकर्षक बॅनर, फुले, रंगवलेले बोर्ड याने शाळेचे प्रांगण या सोहळ्यासाठी दिमाखदार पद्धतीने सजवण्यात आले होते. बहारदार संचलन सौ प्रमिला कदम यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांच्या मार्गदर्शनाखाली सौ वर्षा लाड, सौ प्रमिला कदम, सौ राजश्री हलकंचे, सौ संगीता रोकडे, सौ ज्योती वळसे, सौ रुचिता वाडे, सौ अमृता मालेवार यांच्यासह सौ सुनेना गुट्टे सौ अश्विनी मुंडे, सौ वेणूताई तांदळे यांनी परिश्रम घेतले. सौ शोभा शांतलिंग फुटके यांनी परीक्षणासाठी प्रा वंदना जगतकर यांना सहकार्य केले.

---------------------------------------

आनंद नगरी पाककला स्पर्धेतील विजेते : प्रथम सौ कल्पना सोळंके, द्वितीय सौ योगिता नागरगोजे, तृतीय सौ शुभांगी उदगीरकर व उत्तेजनार्थ सौ मंगला सारस्वत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या