१६ वर्षीय मुलीवर दोघांकडून पाशवी अत्याचार; आरोपीं विरुद्ध 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी: परळी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील धारावती तांडा परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. *बहाण्याने बोलावून केला अत्याचार* मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित मुलीला एका बहाण्याने घरात बोलावून घेतले. मुलगी घरात येताच नराधमांनी दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर तिचे हात-पाय बांधून आणि तोंडात बोळा कोंबून दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्यांनी पीडितेला दिली. *गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू घटनेनंतर पीडितेने धीर एकवटून आपल्या पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पालकांनी तत्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दोन्ही आरोप...