इमेज
  माणिकनगर येथे आज पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसादाचे आयोजन परळी/प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील माणिक नगर, शास्त्री नगर परिसरातील महारुद्र संस्थान येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त आज सोमवार दिनांक 15 जुन रोजी दुपारी 4 ते 6 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात सुरू असलेल्या या पवित्र सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हरिनाम, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा लाभ मिळत आहे.या निमित्ताने आज सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम महारुद्र संस्थान, माणिक नगर, शास्त्री नगर, परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समिती, महारुद्र संस्थान यांच्या वतीने करण्यात ...

१६ वर्षीय मुलीवर दोघांकडून पाशवी अत्याचार; आरोपीं विरुद्ध 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल

परळी वैजनाथ, प्रतिनिधी:

       परळी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील धारावती तांडा परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी पाशवी अत्याचार केल्याची घटना घडली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


*बहाण्याने बोलावून केला अत्याचार*

        मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित मुलीला एका बहाण्याने घरात बोलावून घेतले. मुलगी घरात येताच नराधमांनी दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर तिचे हात-पाय बांधून आणि तोंडात बोळा कोंबून दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्यांनी पीडितेला दिली.


*गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू

       घटनेनंतर पीडितेने धीर एकवटून आपल्या पालकांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पालकांनी तत्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. परळी ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या