इमेज
  शेतातील पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने बैल ठार तर शेतकरी, बैल जखमी  दिंद्रुड : धारूर तालुक्यातील तेलगाव शिवारातील शेतकरी जयप्रकाश उत्तमलाल तोष्णीवाल यांच्या पांढरी नामक शेतात सालगडी बैलजोडीने पाळी घालत असताना पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने ताणाला चिटकून एक बैल जागीच ठार झाला तर शेतमजूर व एका बैलाचा प्राण वाचला असून दोघेही किरकोळ जखमी आहेत. तोष्णीवाल यांच्या शेतात असलेल्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारेला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने बैलाला करंट लागून बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरा बैल व सालगडी दिपक थोरात किरकोळ जखमी झाले आहेत. शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, विद्यार्थिनींच्या सादरीकरणाने रंगला कार्यक्रम...

आवसगाव येथे महिला दिनानिमित्त उखाणे स्पर्धा उत्साहात



जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, विद्यार्थिनींच्या सादरीकरणाने रंगला कार्यक्रम

आवसगाव (ता. केज) : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा आवसगाव यांच्या वतीने महिलांसाठी उखाणे स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थिनींच्या विविध कलागुणांचे सादरीकरणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षिका तसेच पालक प्रतिनिधी यांच्या शुभहस्ते स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

यावेळी महिलांनी “आई मायेचा सागर” या पेटीवरील गीताचे सुंदर सादरीकरण केले तसेच काही महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. शालेय विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. तसेच विद्यार्थिनींनी “जन्म बाईचा” आणि “बाईपण भारी देवा” या गीतांवर आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

यानंतर उखाणे स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत जवळपास ४० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वाधिक उखाणे सादर करत प्रथम क्रमांक श्रीमती गंगासागर श्रीकृष्ण शिनगारे यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक श्रीमती छाया सोमनाथ पोतदार यांनी मिळवला. तर जास्त शब्दांचा मोठा उखाणा सादर केल्याबद्दल उत्तेजनार्थ पारितोषिक श्रीमती मोहरबाई जीवन शिनगारे व श्रीमती उषाबाई भरत साखरे यांना देण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षिका श्रीमती साठे मॅडम, श्रीमती कुलकर्णी मॅडम व श्रीमती जाधव मॅडम यांच्या पुढाकारातून करण्यात आले. यावेळी उपस्थित माता-भगिनींना महिला सक्षमीकरण, शिक्षणाचे महत्त्व व महिलांच्या सर्वांगीण विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित महिलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती साठे मॅडम यांनी केले. महिलांना विशेष मार्गदर्शन श्रीमती जाधव मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव मॅडम यांनी केले. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका श्रीमती कुलकर्णी मॅडम यांनी  उपस्थितांचे आभार मानले व सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट