इमेज
  शेतातील पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने बैल ठार तर शेतकरी, बैल जखमी  दिंद्रुड : धारूर तालुक्यातील तेलगाव शिवारातील शेतकरी जयप्रकाश उत्तमलाल तोष्णीवाल यांच्या पांढरी नामक शेतात सालगडी बैलजोडीने पाळी घालत असताना पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने ताणाला चिटकून एक बैल जागीच ठार झाला तर शेतमजूर व एका बैलाचा प्राण वाचला असून दोघेही किरकोळ जखमी आहेत. तोष्णीवाल यांच्या शेतात असलेल्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारेला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने बैलाला करंट लागून बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरा बैल व सालगडी दिपक थोरात किरकोळ जखमी झाले आहेत. शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

 मौजे बेलंबा गावच्या  पोलीस पाटीलपदी ज्ञानेश्वरी गिते (आंधळे) यांची निवड





परळी – शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. दत्तात्रय आंधळे यांच्या सुकन्या तथा बेलंबा येथील केदारिनाथ गीते यांच्या सुविज्ञ पत्नी ज्ञानेश्वरी केदारीनाथ गीते (आंधळे)  यांची परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे बेलंबा गावच्या पोलीस पाटीलपदी निवड करण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार पार पडलेल्या निवड प्रक्रियेनंतर दि. १० मार्च २०२६ रोजी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. ज्ञानेश्वरीताई केदारनाथ गीते या गावातील सामाजिक कार्यात सदैव सक्रिय असतात. विविध सामाजिक, शैक्षणिक व ग्रामविकासाशी संबंधित उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यांच्या निवडीमुळे गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे, प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधणे तसेच ग्रामविकासाच्या कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा सर्व क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

   दरम्यान, या निवडीबद्दल ज्ञानेश्वरी ताई गीते (आंधळे ) यांचे ॲड. दत्तात्रय आंधळे यांच्या निवासस्थानि परळी वैजनाथ येथील ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख, वेदपाठक साहेब तसेच प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने पुष्पहार घालून पेढा भरवत सन्मान करण्यात आला. त्यांच्या निवडीबद्दल  गावातील नागरिक, नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडून देखील त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पोलीस पाटील म्हणून गावातील कायदा सुव्यवस्था, शिस्त, शांतता व विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प यावेळी ज्ञानेश्वरीताई  गित्ते यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या