इमेज
  शेतातील पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने बैल ठार तर शेतकरी, बैल जखमी  दिंद्रुड : धारूर तालुक्यातील तेलगाव शिवारातील शेतकरी जयप्रकाश उत्तमलाल तोष्णीवाल यांच्या पांढरी नामक शेतात सालगडी बैलजोडीने पाळी घालत असताना पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने ताणाला चिटकून एक बैल जागीच ठार झाला तर शेतमजूर व एका बैलाचा प्राण वाचला असून दोघेही किरकोळ जखमी आहेत. तोष्णीवाल यांच्या शेतात असलेल्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारेला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने बैलाला करंट लागून बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरा बैल व सालगडी दिपक थोरात किरकोळ जखमी झाले आहेत. शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

 परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई : लाखो रुपयांचा गुटखा-पानमसाला जप्त



परळी / प्रतिनिधी : परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने चांदापूर-घाटनादूर रोडवरील लेंडेवाडी शिवारात धाडसी कारवाई करत बेकायदेशीररित्या वाहतूक होत असलेला गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे १ लाख ६५ हजार १३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धम्मानंद नाथा गायसमुद्रे (वय ३५, पोलीस शिपाई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरन क्र. १२०/२०२६ नोंद करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५, २२३, ३(५) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात राजू वाल्मीक सिरसाट (वय ३६, रा. तेलघना ता. अंबाजोगाई जि. बीड) आणि गंगाधर दिंगबरराव मेनकुदळे (वय ३६, रा. शेटे गल्ली, गंगाखेड ता. गंगाखेड जि. परभणी) यांना आरोपी करण्यात आले आहे.

दि. ९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास चांदापूर-घाटनादूर रोडवरील लेंडेवाडी शिवारात आरोपी विनापरवाना आरोग्यास अपायकारक असलेला गुटखा व पानमसाला खरेदी-विक्री व वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली.

या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर गुटखा-पानमसाल्याचा साठा तसेच Hero Splendor Plus (क्र. MH-44-AF-8571) मोटारसायकल जप्त केली.ही कारवाई पोलीस निरीक्षक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि निमोणे करत आहेत. परळी ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून आरोग्यास अपायकारक पदार्थांच्या अवैध व्यापारावर पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या