पोस्ट्स

प्रेस कामगार रामभाऊ मुळाटे यांना मातृशोक

इमेज
  श्रीमती मैनाबाई मुळाटे यांचे निधन; आज अंत्यसंस्कार प्रेस कामगार रामभाऊ मुळाटे यांना मातृशोक परळी वैजनाथ :  परळी शहरातील जुने प्रेस कामगार रामभाऊ मुळाटे यांच्या मातोश्री तथा वैद्यनाथ गल्ली, परळी वैजनाथ येथील रहिवासी (सध्या मुक्काम योगेश्वरी कॉलेजच्या पाठीमागे, अंबाजोगाई) श्रीमती मैनाबाई वीरभद्र मुळाटे वय 88 वर्ष यांचे आज दिनांक ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ४ वाजता बोरुळ तलाव येथे करण्यात येणार आहे. श्रीमती मैनाबाई मुळाटे या अत्यंत प्रेमळ व मनमिळावू स्वभावाच्या असल्यामुळे परिसरात सर्वपरिचित होत्या. कोष्टी समाजाच्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांत त्या सक्रिय सहभाग घेत असत. पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी त्या नित्यनेमाने जात असत, अशी त्यांची धार्मिक वृत्ती होती. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नाते सर्वधर्मसमभावाचे -

इमेज
  नाते सर्वधर्मसमभावाचे - ना. पंकजाताई मुंडे यांनी दिला एजाज देशमुख यांच्या परिवाराला मदतीचा हात गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून पाच लाखाची मदत ; मुस्लिम समाजातील गरीब मुलींच्या  वैद्यकीय शिक्षणासाठी लावणार हातभार बीड दि. २७ -- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचा सर्व धर्मियांशी असलेला जिव्हाळा पुन्हा एकदा दिसून आला. भाजपचे दिवंगत नेते एजाजभाई देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या पाच लाख रूपयांची मदत त्यांनी जाहीर केली, एवढेच नव्हे तर मुस्लिम समाजातील दरवर्षी तीन गरीब मुलींना वैद्यकीय शिक्षणासाठी हातभार लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला.    भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष दिवंगत एजाज देशमुख यांचे नुकतेच निधन झाले, काल शहरात झालेल्या शोकसभेत ना. पंकजाताई मुंडे यांनी एजाजभाई यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे सांगत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.    यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, एजाजभाई हे मुंडे साहेबांचे अत्यंत लाडके कार्यकर्ते होते. अल्पसंख्यांक आघाड...

वैद्यनाथ देवल कमिटीचा उपक्रम

इमेज
  परळी वैजनाथ येथे रामनवमी  निमित्त सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांचा गीत रामायण’ भावस्पर्शी सुरेल सोहळा रंगणार परळी वैजनाथ,(प्रतिनिधी) :- रामभक्तांच्या मनाला भक्तीभावाने भारावून टाकणारा आणि मराठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा ठरलेला ‘गीत रामायण’ हा सुरेल सोहळा यंदाच्या रामनवमी निमित्ताने परळी वैजनाथ येथे रंगणार आहे. वैघनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित या विशेष कार्यक्रमामुळे भक्ती, संगीत आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ तमाम भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन वैद्यनाथ देवल कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.         मराठी साहित्यातील दिग्गज कवी ग. दि. माडगुळकर यांच्या अप्रतिम शब्दांना आणि सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) यांच्या सुरेल संगीताला लाभलेले ‘गीत रामायण’ आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. या अजरामर कलाकृतीला सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या सुमधूर आवाजातून नवसंजीवनी मिळणार आहे.रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री वैजनाथ मंदिराच्या पायथ्याशी (उत्तर बाजू परिसर) हा कार्यक्रम सादर होणार आहे. या क...

१०८ वाचकांकडून दररोज हनुमान चालीसा पारायण.

इमेज
धर्मापुरीत ‘अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा’ ज्ञानयज्ञास उद्यापासून प्रारंभ १०८ वाचकांकडून दररोज हनुमान चालीसा पारायण. परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : तालुक्यातील धर्मापुरी येथील जागृत देवस्थान श्री रोकडेश्वर मंदिरात श्रीराम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त भव्य ‘अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व हनुमान चालीसा पारायण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २६ मार्च रोजी दुपारी २ वाजता या भक्तिमय सोहळ्याचा शुभारंभ होणार असून परिसरात आधीच धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ख्यातनाम ह.भ.प. भागवताचार्य कांतादेव महाराज (दादाहरी वडगावकर) यांच्या रसाळ वाणीतून सादर होणारी ‘श्रीमद् भागवत कथा’ होय. दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत कथा होणार असून अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत भाविकांना सखोल कथाश्रवणाचचा मिळणार आहे. सप्ताहानिमित्त कीर्तन महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे. दररोज रात्री ८ ते १० या वेळेत ह.भ.प. लिंबाजी महाराज आळंदीकर, ह.भ.प. श्रीकांतजी महाराज आळंदीकर, ह.भ.प. सुशांत मह...

नगरसेविकेचा स्तुत्य उपक्रम.....

इमेज
विद्यार्थ्यांसाठी केलेली गुंतवणूक भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची -  नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई  धर्माधिकारी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने नगरसेविका कविता इंगळे यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट  परळी वैजनाथ (प्रतिनिधी)    विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी केलेली गुंतवणूक भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले.त्या डॉ.भालचंद्र वाचनालयासाठी नगरसेविका कविता अनंत इंगळे यांच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभ्यासिकेसाठी स्पर्धा पुस्तके भेट देण्यात आली.त्या स्विकारतांना त्या बोलत होत्या.     नगरसेविका सौ .कविता अनंत इंगळे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 जयंती निमित्ताने परळीचे वैभव असलेल्या डॉ.भालचंद्र वाचनालयातील स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट दिली. ही पुस्तके नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, शिक्षण सभा...

लेकीकडे निघालेल्या आजींना भलतीकडे नेऊन लुटले...

इमेज
'त्या' ऑटोवाल्याला पकडले ;परळी पोलिसांची तत्परता: महिला लूटप्रकरणातील पती-पत्नीला २४ तासांत अटक परळी वैजनाथ:  प्रतिनिधी..        अंबलवाडी घाट परिसरात एका महिलेला लुटणाऱ्या रिक्षाचालक पती-पत्नीला परळी शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली. घटनेचा तपशील: २२ मार्च २०२६ रोजी पीडित महिलेला ऑटोमध्ये लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली. अशी झाली कारवाई: तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढत, २४ मार्च रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींची ओळख: अटक करण्यात आलेल्यांमध्ये मनोज उर्फ सायस केद्रे (वय २८) आणि त्याची पत्नी वैष्णवी मुडे (वय २०, रा. फावडेवाडी, ता. रेणापूर) यांचा समावेश आहे. गुन्ह्यात वापरलेला ऑटोदेखील पोलिसांनी जप्त केला आ...

संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार

इमेज
  संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार खासदार बजरंग सोनवणे यांचे आंदोलन; हमीभाव, निर्यातमुक्ती व सीबीआय चौकशीची मागणी नवी दिल्ली : देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसद भवन परिसरात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. खासदार बजरंग सोनवणे यांनी हे आंदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. कांद्याच्या दरातील सततची घसरण आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रासह देशभरातील बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परत मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. कांद्याला कायदेशीर हमीभाव लागू करावा, निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवून कांदा निर्यात पूर्णपणे मुक्त करावी आणि साठेबाजी तसेच धोरणात्मक अनियमिततेबाबत Central Bureau of Investigation (केंद्रीय अन्वेषण विभाग) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. “शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही...

परळीकरांच्या वतीने शोभायात्रा काढत मंगलमय स्वागत...

इमेज
  म्हैसूर मठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांनी घेतलं ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन मंगल वाद्यासह जयघोषात महास्वामीजींचे परळीकर भाविकांनी केलं आत्मीय स्वागत वैद्यनाथ मंदिराचा अनादी काळापासूनचा वारसा अतिशय चांगला जतन केल्याचे व्यक्त केले समाधान परळी वैजनाथ, प्रतिनिधी...            म्हैसूर येथील येडतोर श्री योगानंदेश्वर सरस्वती मठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांनी आज (दि.२३) बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. परळीकर भाविक भक्तांच्या वतीने महास्वामीजींचे जोरदार मंगलमय स्वागत करण्यात आले. मंगल वाद्यांसह जयघोषात संत जगमित्रनागा मंदिर ते वैद्यनाथ मंदिर अशी स्वागत शोभायात्रा काढण्यात आली.            आद्य शंकराचार्यांच्या शृंगेरी शारदा पिठाच्या अद्वैत परंपरेतील महान विभूती आणि अद्वैत वेदांताच्या प्रचार- प्रसारासाठी कार्यरत असणारे, संपूर्ण देशभर प्रवास करून धर्मजागृती संस्कार आणि अध्यात्मिक मार्ग...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!