१०८ वाचकांकडून दररोज हनुमान चालीसा पारायण.

इमेज
धर्मापुरीत ‘अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा’ ज्ञानयज्ञास उद्यापासून प्रारंभ १०८ वाचकांकडून दररोज हनुमान चालीसा पारायण. परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : तालुक्यातील धर्मापुरी येथील जागृत देवस्थान श्री रोकडेश्वर मंदिरात श्रीराम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त भव्य ‘अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व हनुमान चालीसा पारायण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २६ मार्च रोजी दुपारी २ वाजता या भक्तिमय सोहळ्याचा शुभारंभ होणार असून परिसरात आधीच धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ख्यातनाम ह.भ.प. भागवताचार्य कांतादेव महाराज (दादाहरी वडगावकर) यांच्या रसाळ वाणीतून सादर होणारी ‘श्रीमद् भागवत कथा’ होय. दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत कथा होणार असून अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत भाविकांना सखोल कथाश्रवणाचचा मिळणार आहे. सप्ताहानिमित्त कीर्तन महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे. दररोज रात्री ८ ते १० या वेळेत ह.भ.प. लिंबाजी महाराज आळंदीकर, ह.भ.प. श्रीकांतजी महाराज आळंदीकर, ह.भ.प. सुशांत मह...

परळीकरांच्या वतीने शोभायात्रा काढत मंगलमय स्वागत...

 म्हैसूर मठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांनी घेतलं ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन




मंगल वाद्यासह जयघोषात महास्वामीजींचे परळीकर भाविकांनी केलं आत्मीय स्वागत




वैद्यनाथ मंदिराचा अनादी काळापासूनचा वारसा अतिशय चांगला जतन केल्याचे व्यक्त केले समाधान

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...    

       म्हैसूर येथील येडतोर श्री योगानंदेश्वर सरस्वती मठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांनी आज (दि.२३) बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले. परळीकर भाविक भक्तांच्या वतीने महास्वामीजींचे जोरदार मंगलमय स्वागत करण्यात आले. मंगल वाद्यांसह जयघोषात संत जगमित्रनागा मंदिर ते वैद्यनाथ मंदिर अशी स्वागत शोभायात्रा काढण्यात आली.     

      आद्य शंकराचार्यांच्या शृंगेरी शारदा पिठाच्या अद्वैत परंपरेतील महान विभूती आणि अद्वैत वेदांताच्या प्रचार- प्रसारासाठी कार्यरत असणारे, संपूर्ण देशभर प्रवास करून धर्मजागृती संस्कार आणि अध्यात्मिक मार्गदर्शन करणारे जगद्गुरु परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी हे आज  परळी वैजनाथ नगरीमध्ये खास प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले होते. बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग परळीच्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात त्यांनी वेदोक्त मंत्रोच्चारात प्रभू वैद्यनाथाला अभिषेक करून दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने विश्वस्त राजेश देशमुख, प्रा. प्रदीप देशमुख आदींनी महास्वामीजींचे पुष्पहार, शाल व प्रभू वैद्यनाथाची प्रतिमा देऊन स्वागत केले.

परळीकरांच्या वतीने शोभायात्रा काढत मंगलमय स्वागत

      संपूर्ण देशभरात धर्म जागृतीचे काम करणारे महान विभूती म्हैसूर पिठाधीश्वर जगद्गुरु परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने परळीकर धर्मप्रेमी नागरिक व भाविक सहभागी झाले होते. महास्वामीजींचे आगमन होताच संत जगमित्र नागा मंदिर ते वैद्यनाथ मंदिरापर्यंत मंगलमय वाद्याच्या जयघोषात व फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांची स्वागत शोभायात्रा काढण्यात आली. प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनानंतर वैद्यनाथ मंदिराच्या दर्शन मंडपात त्यांनी उपस्थित सर्व भाविकांना दर्शन व आशीर्वाद दिले. यावेळी तमाम परळीकर यांच्या वतीने  नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी व मान्यवरांनी त्यांचे पूजन करून हृदय स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने परळीकर धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते.

वैद्यनाथ मंदिराचा अनादी काळापासूनचा वारसा अतिशय चांगला जतन केल्याचे व्यक्त केले समाधान

       प्रभू वैद्यनाथ मंदिराचा जाज्वल्य व अनादी काळापासून असलेला पौराणिक वारसा अतिशय चांगल्या पद्धतीने जतन केल्याची भावना यावेळी महास्वामीजींनी व्यक्त केली. वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्रातील अनादी काळापासून असलेल्या विविध देवदेवतांची स्थाने, पार्वती मातेचे स्थान, मंदिर परिक्षेत्रातील बारा ज्योतिर्लिंग देवालये, नारद मंदिर त्याचबरोबर अन्य देव-देवता यांचे अतिशय बारकाईने निरीक्षण करत त्यांनी पौराणिक स्थान महात्म्यानुसार दर्शन घेतले. प्रभू वैद्यनाथ मंदिर उत्तर पायऱ्यांवर असलेल्या आद्य शंकराचार्य मंदिरालाही त्यांनी आवर्जून भेट देत दर्शन घेतले.आद्यशंकराचार्य बारा ज्योतिर्लिंगांची विजय यात्रा करताना त्यांनी परळी वैजनाथ येथेही भेट दिली होती. हा पौराणिक व ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध करण्याबाबत त्यांनी निर्देशित केले. परळी वैद्यनाथ मंदिर येथे जाज्वल्य वारसा व मंदिराचे परीक्षेत्रातील प्राचीन वास्तु वैभव व ऐतिहासिक अवशेष अतिशय चांगल्या पद्धतीने जतन केले असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आद्य शंकराचार्य ज्या ज्या ठिकाणी गेले त्या सर्व ठिकाणी जाऊन त्या त्या सर्व स्थानाबद्दल ची माहिती आणि दर्शन घेण्याची आज्ञा चार पिठांच्या शंकराचार्यांची असल्याने आपण ही विजय यात्रा करत असल्याचे महास्वामीजींनी सांगितले. त्या अनुषंगानेच आद्य शंकराचार्य विजय यात्रेनिमित्त येऊन गेलेल्या या वैद्यनाथनगरी असलेल्या परळीत येऊन वैद्यनाथाचे दर्शन आपल्याला लाभले हे महदभाग्य असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!