नगरसेविकेचा स्तुत्य उपक्रम.....

विद्यार्थ्यांसाठी केलेली गुंतवणूक भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची -  नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई  धर्माधिकारी 




डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने नगरसेविका कविता इंगळे यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)    विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी केलेली गुंतवणूक भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले.त्या डॉ.भालचंद्र वाचनालयासाठी नगरसेविका कविता अनंत इंगळे यांच्यावतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभ्यासिकेसाठी स्पर्धा पुस्तके भेट देण्यात आली.त्या स्विकारतांना त्या बोलत होत्या.

    नगरसेविका सौ .कविता अनंत इंगळे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 जयंती निमित्ताने परळीचे वैभव असलेल्या डॉ.भालचंद्र वाचनालयातील स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट दिली. ही पुस्तके नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी, शिक्षण सभापती योगेश मेनकुदळे, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड, पत्रकार अनिरुद्ध जोशी,शंकर साळवे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ दाने यांच्या हस्ते मुलांना अभ्यासासाठी देण्यात आली.

   याप्रसंगी नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थ्यानिंना मार्गदर्शन केले.तसेच वाचनालय आणि अभ्यासिकेसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.याप्रसंगी रानबा गायकवाड यांनी नगरसेविका कविता अनंत इंगळे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिलेल्या पुस्तकांविषयी आणि बाबासाहेबांच्या ग्रंथ प्रेमाबद्दल माहिती दिली.याप्रसंगी अशोक दहिवडे, पत्रकार महादेव गिते, जयराम गोंडे, रावसाहेब जगतकर यांच्यासह विद्यार्थी ,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!