प्रेस कामगार रामभाऊ मुळाटे यांना मातृशोक
परळी वैजनाथ येथे रामनवमी निमित्त सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांचा गीत रामायण’ भावस्पर्शी सुरेल सोहळा रंगणार
परळी वैजनाथ,(प्रतिनिधी) :- रामभक्तांच्या मनाला भक्तीभावाने भारावून टाकणारा आणि मराठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा ठरलेला ‘गीत रामायण’ हा सुरेल सोहळा यंदाच्या रामनवमी निमित्ताने परळी वैजनाथ येथे रंगणार आहे. वैघनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित या विशेष कार्यक्रमामुळे भक्ती, संगीत आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ तमाम भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन वैद्यनाथ देवल कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठी साहित्यातील दिग्गज कवी ग. दि. माडगुळकर यांच्या अप्रतिम शब्दांना आणि सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) यांच्या सुरेल संगीताला लाभलेले ‘गीत रामायण’ आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. या अजरामर कलाकृतीला सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या सुमधूर आवाजातून नवसंजीवनी मिळणार आहे.रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्री वैजनाथ मंदिराच्या पायथ्याशी (उत्तर बाजू परिसर) हा कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात रामायणातील विविध प्रसंग सुरेल गीतांच्या माध्यमातून सादर होणार असून, उपस्थितांना भक्तीमय वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती लाभणार आहे.
या कार्यक्रमासाठी वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा परळीचे तहसीलदार श्री. विनोद सुभाषराव रणवरे, वैद्यनाथ देवन कमिटीचे सेक्रेटरी श्री. बाबासाहेब वामनराव देशमुख तसेच सर्व विश्वस्तांनी, भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल मेजवानीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.रामनवमीच्या पावन पर्वावर आयोजित हा ‘गीत रामायण’ सोहळा परळीकरांसाठी निश्चितच एक संस्मरणीय सांस्कृतिक पर्व ठरणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा