पोस्ट्स

इमेज
  परळीत सुर्य कोपला! पुढील १५ दिवस पारा ४४ अंशांवर; प्रशासनाकडून 'अलर्ट' जारी परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहर आणि परिसरात पुढील १५ दिवसांत उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढणार असून, हवामान प्रामुख्याने उष्ण आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाढत्या उष्णतेचे संभाव्य परिणाम: १. आरोग्यावर परिणाम: अतिउष्णतेमुळे उष्माघात (Heat Stroke), डिहायड्रेशन, चक्कर येणे आणि त्वचेचे विकार होण्याचा धोका वाढतो. २. पाणीटंचाई: बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने पाणीसाठ्यात घट होऊन पाणीटंचाई जाणवू शकते. ३. शेतीवर परिणाम: कडाक्याच्या उन्हामुळे पिकांना जादा पाण्याची गरज भासेल आणि जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. नागरिकांसाठी उपाययोजना आणि सल्ले: भरपूर पाणी प्या: तहान नसली तरीही नियमितपणे पाणी प्या. लिंबू सरबत, ताक, आणि लस्सी यांसारख्या पेयांचा वापर वाढवा. वेळेचे नियोजन: दुपारी १२ ते ४ या ...

संघटनात्मक फेरबदलाचे संकेत

इमेज
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त बीड: प्रतिनिधी..      वंचित बहुजन आघाडीने बीड जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाचे प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या अधिकृत पत्रानुसार, बीड जिल्ह्यातील 'बीड पूर्व' आणि 'बीड पश्चिम' या दोन्ही जिल्हा कार्यकारिणींसह जिल्ह्यातील सर्व तालुका व शहर कार्यकारिणी तातडीने बरखास्त करण्यात आल्या आहेत.        १५ एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण सूचनेमुळे जिल्ह्यातील सर्व कार्यकारीन्या बरखास्त करण्यात आले आहेत. या निर्णयाची नोंद बीड पूर्व व पश्चिम जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. संघटनात्मक फेरबदलाचे संकेत      कार्यकारिणी बरखास्त करण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठे फेरबदल आणि नवीन नियुक्त्या होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी हा बदल करण्यात येत आहे. त्...

गीता परिवार चा उपक्रम....

इमेज
  परळीत लहान मुलांसाठी 'उन्हाळी सुट्टी विशेष' संस्कार शिबिराचे आयोजन परळी वैजनाथ: प्रतिनिधी...      येथील 'गीता परिवार' आणि 'बचपन प्रायमरी प्ले स्कूल' यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसाठी विशेष उन्हाळी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 'चला शिबिराला बालमित्रांनो!' या संकल्पनेवर आधारित हे शिबीर २२ एप्रिल ते १ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.       मुलांवर उत्तम संस्कार व्हावेत आणि त्यांच्या सुट्टीचा सदुपयोग व्हावा, या उद्देशाने हे शिबीर आयोजित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने शंखनाद प्रशिक्षण हे विशेष आकर्षण असणार आहे. याशिवाय रामरक्षा स्तोत्र, योगासने, मैदानी खेळ, निसर्ग सहल, नाटिका व नृत्य आणि गीता पठण असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत. शिबिरात सहभागी मुलांना रोज पौष्टिक अल्पोपहारही दिला जाईल.या शिबिराद्वारे मुलांना श्रीराम जन्मोत्सव, सीता स्वयंवर, राम-सुग्रीव मैत्री आणि श्रीराम राज्याभिषेक अशा विविध प्रसंगांतून प्रभू श्रीरामांचा आदर्श आणि जीवनमूल्ये शिकवली जाणार आहेत. "सत्य, प्रेम, धैर्य धाम। आपले आदर्श श्रीराम।।" हे या शिब...
इमेज
  पोलिसांना आता कडक हेल्मेटसक्ती; विनाहेल्मेट दिसल्यास थेट सेवापुस्तकात होणार नोंद! महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलात शिस्त आणि रस्ते सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे यांनी ९ एप्रिल २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. या नव्या निर्णयानुसार आता दुचाकी चालवणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाईच नाही, तर त्यांच्या सेवापुस्तकातही तशी नकारात्मक नोंद केली जाणार आहे. गेल्या दशकातील अपघातांची आकडेवारी पाहता दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण ३५ ते ४० टक्के असल्याचे समोर आले असून, खुद्द पोलीस कर्मचाऱ्यांमध्येच हेल्मेट वापराचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. ब्लूमबर्ग फिलिंथ्रॉपीज इनिशिएटिव्हच्या अहवालानुसार मुंबई आणि नागपूरमध्ये हेल्मेट वापराचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक असले, तरी उर्वरित महाराष्ट्रातील शहरांत ही संख्या २० टक्क्यांच्याही खाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर मानून प्रशासनाने सर्व पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा अधीक्षक...
इमेज
दारुड्या मुलाचा राडा: वडिलांवर कोयत्याने वार करून चिमुकलीलाही फेकून दिले! बीड तालुक्यातील लक्ष्मीआई तांडा येथे दारूच्या नशेत धुंद असलेल्या एका मुलाने आपल्या जन्मदात्या पित्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली आहे. १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास सचिन पवार याने दारूच्या नशेत घरातील दुचाकी नेण्याचा हट्ट केला. वडिलांनी त्याला मज्जाव केला असता त्याने चिडून दोन दुचाकींची तोडफोड केली आणि वडिलांच्या डोक्यावर व हातावर कोयत्याने गंभीर वार केले. संतापलेल्या सचिनने केवळ वडिलांनाच नव्हे, तर वाद सोडवण्यास आलेल्या भावाला आणि सुनेलाही मारहाण केली. क्रूरतेचा कळस गाठत त्याने लहान मुलगी कोमल हिला उचलून फेकून दिले आणि घरातील सामानाचे नुकसान केले. जखमी राजू पवार यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून पिंपळनेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत असून या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. #BeedNews #CrimeAlert #MaharashtraPolice #DomesticViolence #SocialIssue
इमेज
मजुराच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; ४ लाखांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास अंबाजोगाई तालुक्यातील हाडबेवाडी येथे मजुरी करून आयुष्यभर साठवलेली पुंजी आणि कष्टाचे सोने अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लंपास केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सायस धोंडिबा गायकवाड हे दाम्पत्य आपल्या मुलीकडे गेले असताना, संधी साधून चोरट्यांनी ११ ते १३ एप्रिल २०२६ दरम्यान त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी धान्याच्या कोठीत व गादीखाली अत्यंत सुरक्षितपणे लपवून ठेवलेले ३ लाख ८० हजार रुपये आणि ४२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. आयुष्यभराची कमाई एका क्षणात गमावल्याने मजूर कुटुंब पूर्णपणे कोलमडले असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बर्दापूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले आरोपींचा तपास करत आहेत. सामान्य कष्टकऱ्याच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या गुन्हेगारांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. #AmbajogaiCrime #BeedPolice #MaharashtraNews #TheftAlert #JusticeForWorkers

परळीत ठिकठिकाणी उपस्थित राहत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा मंत्र आजही तितकाच प्रभावी - माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी परळीत ठिकठिकाणी उपस्थित राहत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन परळी वैजनाथ: प्रतिनिधी....     भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी परळी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माजी नगराध्यक्षतथा नगरसेवक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी परळी वैजनाथ शहरातील ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.      भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त परळी वैद्यनाथ शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी मंत्री आ.धनंजय मुंडे व सहकाऱ्यांच्या समवेत पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. तसेच परळी वैजनाथ शहराच्या विविध भागांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती कार्यक्रमास  परळीचे मा...

परळीत ठिकठिकाणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमांना उपस्थित राहून अभिवादन

इमेज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक - नगराध्यक्षा सौ. पद्मश्री धर्माधिकारी परळीत ठिकठिकाणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमांना उपस्थित राहून अभिवादन परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) -          भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचा अथांग सागर होते. खऱ्या अर्थाने ते ज्ञानाचे  मूर्तिमंत प्रतीक आहेत. न्याय, समता, बंधुता या विचारानेच देशाची  प्रगतीकडे वाटचाल होणार आहे. आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा आपल्या कृतीत आणायला हवा, असे प्रतिपादन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात अभिवादन व विचार व्यक्त करताना केले.      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त परळी वैद्यनाथ शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी मंत्री आ.धनंजय मुंडे व सहकाऱ्यांच्या समवेत पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....