इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-*एसटी कर्मचाऱ्यांच्या एसटी महामंडळाला शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा—प्रा.विजय मुंडे*

 *एसटी कर्मचाऱ्यांच्या एसटी महामंडळाला शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा—प्रा.विजय मुंडे*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

परळी आगाराच्या वतीने तहसील कार्यालयवर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चास जाहीर पाठिंबा देत एसटी महामंडळाला शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे यांनी केली


   परळी आगाराच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीच्या संदर्भात तहसील कार्यालयावर आपल्या मुलाबाळांसह मोर्चा काढण्यात आला एसटी महामंडळाला शासनात विलीनीकरण करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली.

   घोषणाबाजीने तहसील परिसर दणाणून गेला होता दरम्यान पाठिंबा दिल्यानंतर मोर्चा संबोधित करताना प्रा विजय मुंडे म्हणाले की कोरोणा काळात एसटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली त्यांनी केलेली मागणी ही न्याय आहे ही सरकारने मान्य करावी या संपामुळे सामान्य नागरिकांचा सुद्धा पाठिंबा मिळत असून प्रवाशांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे खाजगी वाहन धारक प्रवाशांची आर्थिक लूट करत आहेत.

    दरम्यान कर्मचार्‍यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले तसेच राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांनाही मोबदला मिळाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले मोर्चास विविध राजकीय पक्ष व संघटना यांनीही पाठिंबा दर्शवला आहे

  एसटी मधील ड्रायव्हर ,कंडक्टर व मेकॅनिकल आणि इतर कर्मचाऱ्यांना अल्प वेतन असल्यामुळे नैराश्यातून जवळपास 39 लोकांनी आत्महत्या केली. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी कोणीही आत्महत्या करू नये तसेच संघर्ष करूनच आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजेत त्यामुळे आत्महत्या सारखे पाऊल कोणत्याही कर्मचाऱ्यांनी उचलू नये असे आवाहन त्यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या