MB NEWS-देशाचं भविष्य युवकांच्याच हातात आहे - अजय मुंडे* _मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला यशस्वीतांचा गुणगौरव सोहळा_

 *देशाचं भविष्य युवकांच्याच हातात आहे - अजय मुंडे*

_मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला यशस्वीतांचा गुणगौरव सोहळा_


*मुंडे कुटूंबिय व नानभाऊ यांचे जुने ऋणानुबंध आजही कायम आहेत - अजय मुंडे*


मुंबई....ता.9 केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत सन २०२० मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील यशस्वीतांचा गौरव समारंभ मुंबईत येथील वानखेडे स्टेडियम येथे पार पडला. या सोहळ्याला राज्यभरातून यशस्वी विध्यार्थी उपस्थित होते.



या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री.नानभाऊ पटोले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बीड जिल्हा परिषदेचे गटनेते श्री. अजय मुंडे उपस्थित होते. देशाचे भविष्य युवकांच्या हातात आहे, युवकच देशाला दिशा दर्शक आहेत, युवकांनी स्पर्धा परीक्षेत भाग घेत कठीण परिश्रम घेऊन स्वतःचा उत्कर्ष साधावा असे यावेळी श्री. मुंडेंनी म्हटले आहे.


या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री नानभाऊ पटोले यांचा आदर - सत्कार बीड जिल्हा परिषदेचे गटनेते श्री अजय मुंडे यांनी केला व मुंडे कुटुंबीय व नानाभाऊ यांचे असलेले जुने ऋणानुबंध आजही कायम आहेत. अशी आठवण या भेटीच्या निमित्ताने झाली असेही श्री अजय मुंडे यांनी सांगितले. 


केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस यावेळी शुभेच्छा श्री. मुंडेंनी दिल्या व या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला निमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचे आभार देखील श्री. अजय मुंडे मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !