इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-"सबको काट डालेंगे" म्हणत चोरट्यांचा थरार.......! परळी तालुक्यात चोरांना रान मोकळे:सिरसाळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ: शस्त्रांचा धाक दाखवून घरफोडी; नागरिकांमध्ये दहशत

 "सबको काट डालेंगे" म्हणत चोरट्यांचा थरार.......!

परळी तालुक्यात चोरांना रान मोकळे:सिरसाळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ: शस्त्रांचा धाक दाखवून घरफोडी; नागरिकांमध्ये दहशत 



 परळी वैजनाथ/प्रतिनिधी......

       दररोज नोंद होत असलेल्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे.परळी तालुक्यात चोरांना रान मोकळे झाले असल्याचे दिसून येत आहे.सिरसाळ्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन शस्त्रांचा धाक दाखवून घरफोडीची मोठी घटना दि.७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.या घटनेने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.   सिरसाळा येथे घरफोडीत सुमारे अडिच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. 

         सध्याच्या काळात सर्वत्र चोरीच्या घटननांची साखळी खंडीत होत नसल्याने लोकांमध्ये एकप्रकारे मोठा धसका बसलेला आहे.अन्य कोणत्याही बाबींचा विचार न करता चोरीच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाचे प्राधान्य आहे.अशाही परिस्थितीत चोरट्यांची मनस्थिती मात्र बदललेली दिसत नाही.सर्वत्र चोरटे धुमाकूळ घालत आहेत. दररोज चोरीच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात होत आहे.गेल्या दोन दिवसांपूर्वी (दि.७) परळी तालुक्यातील सिरसाळा येथे न्यु हायस्कूल शेजारच्या वसाहतीत सशस्त्र चोरट्यांनी अक्षरशः सिनेस्टाईल धुमाकूळ घालत घरफोडी केली. फिर्यादी संपती गंगाधर पुरी यांच्या घरात अज्ञात चार चोरट्यांनी घुसुन घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा दोन लाख त्रेपन्न हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. विशेष म्हणजे चोरटे चार जण होते.त्यांच्या तोंडावर रुमाल बांधलेले होते,हातात धारदार शस्त्र होती . चोरट्यांनी घरात प्रवेश करुन थेट मारहाण सुरू केली शस्त्रांचा धाक दाखवला.फिर्यादीच्या डोळ्यावर बुक्की मारली.फिर्यादी व साक्षीदारांना शस्त्रांचा धाक दाखवून घरातील किमती दागिने व रोख रक्कम लंपास केली.सिरसाळा हद्दीतील या घरफोडीत सुमारे अडिच लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पो.उपनि.शेळके हे करीत आहेत.

 🕳️चोरट्यांचा थरार........

     या वसाहतीत अक्षरशः चोरट्यांनी थरार निर्माण केला.आजुबाजुचे शेजारी  जागे झाले तेव्हा "आगे मत आ़ओ सबको काट डालेंगे " असे हिंदी भाषेत धमकावत चोरटे परागंदा झाले.या दहशतीने नागरीकांत प्रचंड भिती पसरली आहे.या चोरीच्या घटनेचा असुन तपास करावा व अशा घटनांमागे चोरट्यांची मोठी टोळी सक्रिय झाली असण्याची शक्यता आहे याचा शोध घ्यावा.अशी मागणी घाबरलेले नागरिक करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या