इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिक विमा व अनुदान रक्मेतुन बॅंकांनी पिक कर्जाची रक्कम कपात करू नये अन्यथा आंदोलन-राजेश गित्ते

 शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिक विमा व अनुदान रक्मेतुन बॅंकांनी पिक कर्जाची रक्कम कपात करू नये अन्यथा आंदोलन-राजेश गित्ते 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

शेतकरी गेली चार वर्ष निसर्गाच्या लहरी पणामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे.या वर्षी ही शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात कर्ज घेऊन पेरणी केली . पिक चांगले येऊन उत्पादन चांगले होईल व आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल असे वाटत असताना अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले व तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरी पणामुळे आर्थिक नुकसान झाले.

.शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत व्हावी यासाठी अनुदान व २५टक्के पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे.शेतकरी यांना वाटले या रकमेतून आर्थिक हातभार लागेल.पण जेव्हा शेतकऱी बैंकेत गेले तेव्हा त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रक्कमेतून पिक कर्जाची रक्कम कपात करण्यात आली होती .

आज राजेश गित्ते यांनी शेतकरी आणि विविध गावचे सरपंच यांना सोबत घेऊन स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र शाखा परळी वैजनाथचे मेनेजर यांना निवेदन देण्यात आले व तात्काळ कपात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून पुढील काळात रक्कम कपात करण्यात येऊ नये असे निवेदनात म्हटले आहे. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन बैंके समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा नेते राजेश गित्ते यांनी दिला आहे.

या निवेदनावर मा प समिती सदस्य मारोतराव फड, नंदनंज सरपंच अनिल गुट्टे,मिरवट सरपंच धुराजी साबळे, मिरवट चेअरमन भरतराव इंगळे, मिरवट उपसरपंच रामेश्वर महाराज इंगळे, मांडवा उपसरपंच अंगदराव नागरगोजे , मांडवा युवा नेते कारभारी मुंडे, दशरथ गिते, माऊली आंधळे, भास्कर गिते आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या