पोस्ट्स

जून १४, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सीसीटीव्हीत थार गाडी कैद, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी

इमेज
  परळीत थार गाडीचा थरार : गाडीची धडक की जाणीवपूर्वक उडवले? प्रशांत देशमुख गंभीर जखमी; सीसीटीव्हीत थार गाडी कैद, आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी परळी वैजनाथ | प्रतिनिधी परळी वैजनाथ येथे एका धक्कादायक घटनेत प्रशांत प्रल्हाद देशमुख यांना थार गाडीने संत भगवान बाबा चौक ते तहसील कडे जाणाऱ्या रस्त्यावर धडक देऊन चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत प्रशांत देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून देशमुख कुटुंबीयांनी हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित थार गाडी स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. देशमुख कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, फुटेजमध्ये चारचाकी वाहन चालकाने संशयास्पद पद्धतीने मागून गाडी आणून धडक दिल्याचे दिसत असून या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प...
इमेज
हरित परळी अभियानासाठी आज नियोजन बैठक; मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी परळी वैजनाथ | प्रतिनिधी     परळी शहर अधिक हिरवेगार, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने नगर परिषद परळीच्या वतीने लवकरच शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या नियोजनासाठी रविवार, दि. २१ रोजी सकाळी ७ वाजता जिजामाता उद्यान येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन  नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली.      या बैठकीस ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते मयंक गांधी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. वृक्ष लागवडीसाठी योग्य स्थळांची निवड, वृक्षसंवर्धनाची कार्यपद्धती तसेच नागरिकांचा सहभाग वाढविण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे. सध्या वाढते तापमान, घटते पर्जन्यमान आणि पर्यावरणीय असंतुलन ही गंभीर आव्हाने जगासमोर उभी आहेत. या समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन अत्य...

कला प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांच्या कलाकृतींनी वेधले लक्ष

इमेज
कलामयी आर्ट क्लासेसच्या तिसऱ्या कला प्रदर्शनाचे नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले उद्घाटन कला प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांच्या कलाकृतींनी वेधले लक्ष परळी वैजनाथ | प्रतिनिधी        परळी शहरातील कला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या मैथिली लोंढे यांच्या कलामयी आर्ट क्लासेस आयोजित तिसऱ्या भव्य कला प्रदर्शनास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कला प्रदर्शनाचे उद्घाटन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी भाजप नेत्या डॉ. शालिनी कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.      काळाराम मंदिर, आंबेवेस, परळी वैजनाथ येथे 20 व 21 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाकृती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. ‘रंग, कल्पना आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनात चित्रकला, रेखाटन, क्रिएटिव्ह आर्ट, विविध पेंटिंग्ज, व्यक्तिचित्रे (पोर्ट्रेट), रंगोळी तसेच इतर अनेक कलाकृतींचा समावेश करण्यात आला आहे...

इंदपवाडीच्या शाळेत बालसभेत झाला ऋषिकेशचा सत्कार

इमेज
माझा कंटाळा आई-वडिलांकडे पाहिलं की आपोआप निघून जायचा - अग्निवीर ऋषिकेशने दिली विद्यार्थ्यांना प्रेरणा! इंदपवाडीच्या शाळेत बालसभेत झाला ऋषिकेशचा सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी तालुका परळी वैजनाथ येथे नव्या शैक्षणिक वर्षातील पहिली बाल सभा गुरुवारी संपन्न झाली. पहिल्या बालसभेच्या अध्यक्षस्थानी इयत्ता सातवी वर्गाची विद्यार्थिनी कु आनंदी विष्णू मुंडे ही निवड करण्यात आली होती.  बालसभेचा यावेळचा विषय होता माझी शाळा. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गावचे सुपुत्र ऋषिकेश बिबीशन मुंडे ज्यांची नुकतीच आर्मीमध्ये निवड झाली आहे. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष केशवराव मुंडे शाळेचे मुख्याध्यापक सुभाष केंद्रे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते.  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. अग्निवीर म्हणून आर्मीमध्ये निवड झालेल्या ऋषिकेश बिबीशन मुंडे यांचा वडिलांसह सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर इयत्ता पाचवी वर्गातून शिष्यवृत्तीसाठी पास झालेली विद्यार्थिनी मानवी माणिक मुंडे हीच ही यावेळी सन्मान करण्यात आला.  इयत...
इमेज
पाटोदा बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन महिलेचे दागिने लंपास; अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल पाटोदा: बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन एका महिला प्रवाशाचे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा तालुक्यातील डोमरी येथील रहिवासी माया अशोक भोंडवे या १८ जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पाटोदा बसस्थानकावरून बसमध्ये चढत होत्या. यावेळी बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने भोंडवे यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि २० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल शिताफीने लांबवला. बसमध्ये बसल्यानंतर भोंडवे यांच्या गळ्यातील दागिने गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु दागिने मिळून आले नाहीत. अखेर त्यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक...
इमेज
  नीट-युजी 2026 परीक्षा: एनटीएने जारी केला अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक, चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार थेट अपडेट्स नवी दिल्ली येथे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) नीट-युजी पुनर्रचना परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आणि अफवांना आळा घालण्यासाठी आपला अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक **+91 7827980287** जाहीर केला आहे. सोशल मीडियावर नीट परीक्षेबाबत पसरणारे बनावट मेसेज, पेपर लीकच्या खोट्या अफवा आणि फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी एनटीएने हे पाऊल उचलले असून याद्वारे अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल सुरू करण्यात आले आहे. हे अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल केवळ एकतर्फी ब्रॉडकास्ट सेवा (Broadcast Service) म्हणून काम करेल, म्हणजेच विद्यार्थ्यांना यावर परीक्षेचे वेळापत्रक, नवीन प्रवेशपत्र (Admit Card) आणि आवश्यक सूचनांचे थेट संदेश प्राप्त होतील, परंतु त्यांना यावर रिप्लाय किंवा संदेश पाठवता येणार नाही. एनटीएने स्पष्ट केले आहे की, अधिकृत अकाऊंटवर 'ब्लू व्हेरिफाइड टिक' आणि 'National Testing Agency' हे नाव असणे अनिवार्य आहे. एजन्सी कधीही व्हॉट्सॲपवर ओटीपी, वैयक्तिक माहिती किंवा बँक तपश...
इमेज
  पैसे न दिल्याने पोटच्या मुलाकडून ६५ वर्षीय वृद्धाला काठीने अमानुष मारहाण आष्टी: तालुक्यातील शिरापूर येथे पैसे दिले नाहीत या शुल्लक कारणावरून पोटच्या मुलाने आपल्या ६५ वर्षीय वृद्ध वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या मारहाणीत वृद्ध वडील गंभीर जखमी झाले असून, अंभोरा पोलीस ठाण्यात नराधम मुलाबाहेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरापूर येथील रहिवासी शिवाजी गंगाराम देवकर यांनी मुलगा युवराज शिवाजी देवकर याला पैसे देण्यास नकार दिला. याचा प्रचंड राग मनात धरून आरोपी युवराजने १७ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राहत्या घराजवळ वडिलांना गाठले. त्याने हातातील काठीने वृद्ध वडिलांच्या मांडीवर, पाठीत, हातापायावर बेदम मारहाण करत मुका मार दिला. एवढ्यावरच न थांबता त्याने डाव्या बाजूच्या डोक्यात काठी मारून वडिलांना गंभीर जखमी केले. मारहाण करतानाच आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडित वृद्ध वडिलांनी अंभोरा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी युवराज देवकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम...
इमेज
रामराव कांबळे यांची अखिल भारतीय मातंग संघाच्या परळी तालुकाध्यक्षपदी निवड परळी (प्रतिनिधी)   दिनांक 12 जून 2026 रोजी कृष्णाई हॉटेल अंबाजोगाई येथे आठ टक्के आरक्षण संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला उपस्थित असलेल्या अखिल भारतीय मातंग संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा त्याग माता क्रांतीज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले यांनी  रामराव कांबळे यांची अखिल भारतीय मातंग संघ परळी तालुका अध्यक्षपदी निवड केली  तसेच दामोदर ताटे यांची डॉ .बाबासाहेब गोपले सेना सोनपेठ तालुका सरचिटणीसपदी निवड    केली.                                    या  बैठकीस डॉ. बाबासाहेब गोपले,  सेना सोनपेठ तालुकाध्यक्ष  वसंत साळवे, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष काष्टी मॅडम, भिवंडी शहरप्रमुख जोगदंड सर,  रामराव कांबळे , दामोदर ताटे, तुकाराम साळवे आदींची उपस्थिती होती. मातंग समाजाला स्वातंत्र्य आठ टक्के आरक्षण मिळाव यासाठी क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांनी अंबाजोगाई शहर या ठिक ठिकाणी बैठका आयोज...
इमेज
  नीट पुनर्परीक्षार्थींना एसटीचा मोफत प्रवास द्या; ॲड. जीवन देशमुख यांची मागणी परळी | प्रतिनिधी 21 जून रोजी होणाऱ्या नीट (NEET) पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष ॲड. जीवन देशमुख यांनी मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ॲड. देशमुख यांनी म्हटले आहे की, नीट परीक्षा यापूर्वी पार पडली होती. मात्र, पेपरफुटीच्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांची व पालकांची कोणतीही चूक नसताना पुन्हा परीक्षा घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावासह आर्थिक भारही सहन करावा लागत आहे. 21 जून रोजी होणाऱ्या या पुनर्परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या गावापासून दूर असलेल्या परीक्षा केंद्रांवर जावे लागणार आहे. सध्या पेरणीचा हंगाम सुरू असून बहुतांश पालक शेतकरी व मजूर वर्गातील आहेत. अशा परिस्थितीत प्रवासाचा अतिरिक्त खर्च करणे अनेक कुटुंबांसाठी जिकिरीचे ठरत आहे, असे त्यांनी नम...
इमेज
  परळीत शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन उत्साहात; अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण परळी वैजनाथ | प्रतिनिधी शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार, दि. १९ जून रोजी परळी वैजनाथ येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात उत्साहपूर्ण वातावरणात भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी "जय भवानी, जय शिवाजी", "शिवसेना जिंदाबाद", "हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो", तसेच "उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं" अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. घोषणांच्या गजरात संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. भगव्या ध्वजाखाली एकत्र आलेल्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या विचारांशी निष्ठा राखण्याचा आणि संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी मार्गदर्शन करताना अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांनी सर्व शिवसैनिकांना वर्ध...
इमेज
बीडच्या राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारप्राप्त रोहन बहीरवर बालभारतीत धडा! बीड– पुरात वाहून जाणाऱ्या महिलेला स्वत:च्या जीवाची बाजी लावून वाचवण्यासारखे धाडस दाखवलेल्या बीडमधील रोहन रामचंद्र बहीर-पाटील या मुलावर बालभारतीच्या सहावीच्या पाठ्यपुस्तकात स्वतंत्रपणे एक धडा घेण्यात आला आहे. खुद्द रोहनचे कुटुंबीयही या संदर्भात अनभिज्ञ होते. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात धडा घेतल्याची माहिती कालच (गुरुवारी, १८ जून) आम्हाला मिळाल्याचे रोहनचे वडील रामचंद्र बहीर यांनी सांगितले. बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील रहिवासी असलेल्या रोहन बहीर याने २६ सप्टेंबर २०२१ मध्ये छायाबाई गायकवाड या महिलेला डोंगरी नदीला आलेल्या पुरात वाहून जाण्यापासून वाचवले होते. त्यावेळी रोहन बहीर नवगण राजुरीतील गजानन विद्यालयात दहावीत शिक्षण घेत होता. रोहनच्या धाडसाचे त्यावेळी सर्वत्र कौतुक झाले, परंतु त्याच्या शौर्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली जावी, यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते डाॅ. संजय तांदळे यांनी पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले. रोहनला अगदीच कोवळ्या वयात म्हणजे पंधराव्या वर्षी दाखवलेल्या धाडसासाठी २०२३ साली पंतप्रधान राष्...
इमेज
GVT व वृक्षसंवर्धन चळवळीचा मोठा संकल्प; २५ लाख वृक्षलागवडीसाठी २१ जूनला मयंक गांधी यांच्या उपस्थितीत परळीत बैठक परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ शहराला अधिक हरित आणि सुंदर बनवण्यासाठी एक मोठी पर्यावरणीय लोकचळवळ उभी राहत आहे. 'ग्लोबल विकास ट्रस्ट' (GVT) ने तालुक्यात तब्बल २५ लाख वृक्षलागवड करण्याचा संकल्प सोडला आहे त्यानुषंगाने आपल्या शहरात सुद्धा GVT व 'वृक्षसंवर्धन चळवळ, परळी वैजनाथ' यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. या भव्य मोहिमेची रूपरेषा आखण्यासाठी येत्या रविवारी २१ जून रोजी योग दिवसाचे औचित्य साधून एका विशेष अनौपचारिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. *ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मयंक गांधी करणार मार्गदर्शन* या बैठकीचे मुख्य आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जल-पर्यावरण चळवळीचे प्रणेते मा. मयंकजी गांधी यांची लाभलेली प्रमुख उपस्थिती. बैठकीत उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना आणि पर्यावरण प्रेमींना मयंक गांधी यांच्याशी थेट संवाद साधून पर्यावरण संवर्धनाचे धडे घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. जागतिक योग दिनाचे औचि...

ना. पंकजात मुंडे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले निर्देश

इमेज
माझी वसुंधरा अभियानात लोकसहभाग वाढविण्यावर भर;हवामान कृती आराखड्याचा नियमित आढावा घ्या ना. पंकजात मुंडे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले निर्देश मुंबई, दि. १९ : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या *माझी वसुंधरा अभियान* आणि राज्य वातावरणीय बदल कक्षाच्या पुनर्रचनेसंदर्भात आज पर्यावरण वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा घेतला. युवक, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक प्रभावकांचा (इन्फ्लुएन्सर्स) मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढविण्यावर भर द्यावा. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हवामान कृती आराखड्यांवर नियमित चर्चा व्हावी तसेच मंत्रिमंडळ बैठकीत दरमहा हवामान बदल विषयाचा आढावा घेण्यासंदर्भात पुढाकार घेणार असल्याचे यावेळी श्रीमती मुंडे यांनी सांगितले. यावेळी विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, उपसचिव जॉय ठाकूर आदी उपस्थित होते. श्रीमती मुंडे म्हणाल्या की, माझी वसुंधरा अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी ‘वसुंधरा रक्षक’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात यावी. या अभियानात युवक, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक प्रभाव...

ना. पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात घेतला विभागाचा आढावा

इमेज
  राज्यातील जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचा सहा महिन्यांत अहवाल सादर करा ना. पंकजा मुंडे यांनी मंत्रालयात घेतला विभागाचा आढावा मुंबई, दि. १९ – राज्यातील विविध रुग्णालयांतून निर्माण होणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण, त्यावरील प्रक्रिया, वैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्रांची क्षमता, प्रत्यक्ष कामकाज आणि संबंधित भागातील गरज यांचा सखोल अभ्यास करून सहा महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. वैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्रांच्या कामकाजावर नियमित नियंत्रण ठेवण्याबरोबरच विद्यमान धोरणात आवश्यक बदल करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्रांबाबतची सद्यस्थिती व अधिकार क्षेत्राच्या पुनर्रचनेसंदर्भात मुंडे यांनी आज मंत्रालयीन दालनात बैठक घेतली. यावेळी विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, उपसचिव जॉय ठाकूर आदी उपस्थित होते. राज्यातील वैद्यकीय कचरा (बायो-मेडिकल वेस्ट) व्यवस्थापनाची सध्याची स्थिती, उपचार केंद्रांची क्षमता, परवानगी प्रक्रिया आणि ...
इमेज
  परळी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना साठवा वर्धापन दिन साजरा   परळी वैजनाथ आज दिनांक 19 जून रोजी परळी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनेचा साठवा वर्धापन दिन परळी येथील भगवान बाबा प्राथमिक विद्यालयात  शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच पूजन  करून  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमर रहे घोषणा देण्यात आल्या.     विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बीड श्री नारायणराव सातपुते यांनी आपले विचार मांडले तसेच भगवान बाबा प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दहिफळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री आघाव सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता शिवसेना तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल शिवसेना शहर प्रमुख राजेश विभुते शिवसेना विधानसभा प्रमुख जगन्नाथ साळुंखे शिवसेना उप तालुका प्रमुख महेश केंद्रे शिवसेना युवा सेनेचे उपाधिकारी सचिन लोढा शिवसेना तालुका सचिव प्रकाश साळुंखे विभाग प्रमुख विशाल...

तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

इमेज
बारावीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला, प्रकृती चिंताजनक अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील ट्युशन एरियात रात्री अभ्यासिका संपवून रूमवर परतणाऱ्या आशिष विनोद माने या १७ वर्षीय विद्यार्थ्यावर दुचाकीवरून आलेल्या तीन गुंडांनी भर रस्त्यावर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिषला उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे ट्युशन एरियातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष माने (वय १७, रा. रेपेवाडी, सध्या रा. माळीनगर, अंबाजोगाई) हा १२ वी सायन्सचा विद्यार्थी आहे. तो अंबाजोगाईत भाड्याने रूम घेऊन राहतो. बुधवारी (दि.१७) रात्री १२ वाजेच्या सुमारास तो परिसरातील एका अभ्यासिकेतून अभ्यास करून रूमवर पायी जात असताना हा प्रकार घडला. यावेळी दुचाकीवर आलेल्या साहिल मांदळे, जीतू मांद...

पिट लाईन, वंदे भारतसह नव्या रेल्वेगाड्यांची मागणी: परळी रेल्वे विकास समितीचे निवेदन

इमेज
परळी रेल्वे विकास समितीच्या धरणे आंदोलनाच्या दणक्यानंतर द म रेल्वेचे सिकंदराबाद  विभागीय व्यवस्थापकांनी परळीत घेतला आढावा पिट लाईन, वंदे भारतसह नव्या रेल्वेगाड्यांची मागणी: परळी रेल्वे विकास समितीचे निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी...    शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषद आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद  विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपालकृष्णन यांना भेटून  निवेदन सादर केले.       परळी रेल्वे विकास समितीच्या ०८ जून च्या धरणे आंदोलना नंतर दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद  विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपालकृष्णन यांनी आज (दि.१८) सकाळी परळी वैजनाथ रेल्वे स्थानकापासून भेट देऊन नविन रेल्वे स्थानक उभारणी,रेल्वे मार्गाची कामे, प्रशासकीय विषय,प्रवाशी सुविधा आदींबाबत परळीत आढावा घेतला. परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषद आणि विविध सामाजिक ...

महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या मुख्य कार्यालयाकडे अंदोलकांच्या मागणीचा पाठपुरावा केल्या जाणार ...

इमेज
  क्षेत्रीय व्यवस्थापकांच्या लेखी आश्वासना नंतर सिरसाळ्यातील बॅंक मॅनेजर विरोधातील अंदोलन स्थगित  महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या मुख्य कार्यालयाकडे अंदोलकांच्या मागणीचा पाठपुरावा केल्या जाणार  बॅंक कर्मचारी/अधिकारी खातेदार,नागरिकांशी समन्वयाने वर्तन करतील  - क्षेत्रीय व्यवस्थापक हर्षद कुराडे यांची ग्वाही  ● अंदोलनास संतप्त शेकडो  खातेदार, नागरिकांचा पाठिंबा  सिरसाळा :  महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा सिरसाळ्याचे मॅनेजर हे खातेदार,पत्रकार,शेतकरी यांच्याशी उद्धट वर्तन करत मग्रूरिने बोलत असल्याने या भागातील नागरिकांत रोष निर्माण झाला आहे.त्यांची या ठिकाणाहून बदली करण्या संदर्भात सिरसाळ्यात पत्रकार मिलिंद चोपडे व त्यांचे सहकारी अदित्य मेंडके, गणेश काळे यांनी तीन दिवस महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा सिरसाळा समोर दिनांक १६ जून ते १८ जून पर्यंत ठिय्या अंदोलन केले .  लवकरात लवकर व्यवस्थापक संदिप रेड्डी यांची बदली ची प्रक्रिया करुन सिरसाळा महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेस सुसंवाद करणारा व खातेदारांशी समन्वयाने वर्तन करणारा मॅनेजर देण्यात यावा अशी मागणी केली.  ...
इमेज
ऊन्हाची तिव्रता व पाण्याची टंचाई लक्षात घेता राज्यातील शाळा विदर्भाच्या धर्तीवर  शाळा 01 जुलैपासून सुरू कराव्यात अथवा सकाळच्या सत्रात भरवाव्यात - मराठवाडा शिक्षक संघाची मागणी परळी / प्रतिनिधी विदर्भ वगळता राज्यातील शाळा दि.१५ जून रोजी सुरू झाल्या आहेत. विदर्भातील शाळा मात्र तेथील उन्हाची तीव्रता व पाण्याची टंचाई मुळे १ जुलै पासून सुरुवात होत आहेत.विदर्भा प्रमाणेच उर्वरित महाराष्ट्रातील शाळा 01 जुलै पासून सुरू कराव्यात अथवा सकाळच्या सत्रात भरवाव्यात अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाने केली आहे.        मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्र कार्यकारिणी सदस्य बंडू आघाव यांनी याबाबत दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, अलनिनोच्या प्रभावाने महाराष्ट्रात अद्याप पाऊस झाला नाही. काही भागात थोड्या प्रमाणात पाऊस झाला व नंतर पावसाने मोठी उघडीप दिल्यामुळे संपूर्ण राज्यभर उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.उन्हाची तिव्रता व भीषण पाणी टंचाईला जनता तोंड देत आहे. सर्वत्र विदर्भा सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे.शाळेतील कुपनलिकांचे पाणी आटले आहे. शालेय पोषण शिजवण्यासाठी पाणी ...
इमेज
  घरावरील छाप्यात ३६ हजारांचा गांजा जप्त; ७० वर्षीय महिलेला पोलिसांकडून अटक बीड: शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका घरावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गांधीनगर येथील शिवसेना कमानीजवळील एका घरात अनधिकृतपणे गांजा बाळगून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पेठ बीड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी १६ जून २०२६ रोजी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास छापा टाकून ३६ हजार ४४४ रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.   पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आणि नगर परिषदेच्या शासकीय पंचांसमक्ष ही कारवाई केली. संशयित कमलबाई राधाकिसन खंडागळे (वय ७०, रा. गांधीनगर, पेठ बीड) हिच्या घराची झडती घेतली असता, झाडू बनवण्याच्या पानाच्या बंडलमध्ये लपवून ठेवलेला ६ किलो ७४ ग्रॅम निव्वळ गांजा मिळून आला. हा अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने साठवला असल्याने पोलिसांनी तो जागीच सीलबंद केला असून ७० वर्षीय संशयित महिलेला महिला अंमलदारांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये अधिनियम (NDPS ...
इमेज
आईचे स्वप्न साकारण्यासाठी ७० लाखांचे दातृत्व!  बिभीषण गायकवाड यांनी स्वखर्चातून सुकळीत उभारली जिल्हा परिषद शाळा केज: सामाजिक बांधिलकी आणि मातृप्रेमाचा एक अनोखा आणि प्रेरणादायी आदर्श बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पाहायला मिळाला आहे. सुकळी येथील रहिवासी आणि पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बिभीषणराव गायकवाड यांनी आपल्या दिवंगत आईचे स्वप्न साकार करण्यासाठी तब्बल ७० लाख रुपये स्वतः खर्च करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी पाच सुसज्ज आरसीसी वर्गखोल्या उभारल्या आहेत. या नूतन आणि आधुनिक शाळा इमारतीचे दिमाखदार लोकार्पण बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहमान यांच्या हस्ते बुधवारी, १७ जून रोजी अत्यंत उत्साहात पार पडले. एकेकाळी मोडकळीस आलेल्या वर्गखोल्यांमुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती सोसणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी गायकवाड यांचे हे दातृत्व एक मोठे वरदान ठरले असून, आता गावातील चिमुरड्यांना दर्जेदार वातावरणात ज्ञानार्जन करता येणार आहे. एकेकाळी या जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती, ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मो...
इमेज
राष्ट्रवादी (शप) शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सिकंदराबाद  विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना सोपवले पत्र परळी रेल्वे प्रवाशांच्या आंदोलनाची खासदारांकडून दखल; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना साकडे! परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग (बाप्पा) मनोहर सोनवणे यांनी परळी वैजनाथ रेल्वे टर्मिनसच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद  विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर. गोपालकृष्णन मार्फत पत्राद्वारे महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. ८ जून रोजी परळी वैजनाथ येथे रेल्वे प्रवाशांनी केलेल्या 'एक दिवशीय धरणे आंदोलना'ची दखल घेत खासदारांनी हे पत्र लिहून रेल्वेमंत्र्यांकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील, ज्येष्ठ नेते ॲड. जीवनराव देशमुख,गटनेते नितीन बागवाले,नगरसेवक कादर क...

पुरस्कारप्राप्त कामगारांची नावे:

इमेज
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे पुरस्कार : ५१ कामगारांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर बीड (प्रतिनीधी) : कामगार विश्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कामगार भूषण व  विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार-२०२४ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. कामगार कल्याण मंडळाकडून  राज्यातील ५१  कामगारांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार व एका कामगाराला कामगार भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. कामगार कल्याण निधी भरणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांना साहित्य, सामाजिक, शैक्षणिक,  क्रीडा आदी क्षेत्रात विशेष योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात. गुणवंत कामगार पुरस्कारासाठी रु. २५ हजार, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र आणि कामगार भूषण पुरस्कारासाठी रु. ५० हजार, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येते. पुरस्कारप्राप्त कामगारांची नावे:  अरविंद हळदकर- कोल्हापूर(कामगार भुषण)अंकुश जाधव- पुणे, ज्योत्सना निमगडे- चंद्रपूर, अविनाश वाडेकर- पुणे,  माधुरी निर्माळे- अमरावती,  सुखदेव फुलारी- अहिल्यानगर, हेमंत पवार- पुणे, कविता नवघरे- चंद्रपूर, हनुमंत ढवळे- सातारा, मनाली सा...

सदगुरु सेवा समितीच्या-वतीने महाप्रसादाचे आयोजन

इमेज
श्री क्षेत्र येवती( लघु आळंदी) येथील मठाधिपती श्री सद्‌गुरू नराशाम महाराज येवतीकर यांचा ४७ वा वाढदिवस :अभिष्टचिंतनाचा उत्साह विशेष वृत्त /अमोल जोशी पाटोदा      नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती (लघु आळंदी) येथील जागृत देवस्थान सद्‌गुरू नराशाम महाराज मठ संस्थांनचे मठाधिपती श्री सद्‌गुरू नराशाम महाराज यांचा ४७वा वाढदिवस मोठ्या उत्साहात भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला आहे. श्री सद्गुरू नराशाम महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी व सद्गुरु चा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक भाविकांनी एकच गर्दी केली आहे. मुखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र येवती येथे श्री सद्‌गुरू नराशाम महाराज जागृत मठ संस्थान आहे. या संस्थांनचे  मठाधिपती सद्‌गुरू नराशाम महाराज यांचा ४७वा वाढदिवस सद्‌गुरू सेवा समितीतर्फे नुकताच मठ संस्थान येवती (लघु आळंदी ) येथे उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी श्री सद्‌गुरू नराशाम महाराज यांची औक्षवंत, पाद्यपूजा, ग्रंथतुला करण्यात आली आहे. यावेळी ३१ सुहासिनी यांनी श्री सद्‌गुरू नराशाम महाराज यांना औक्षवंत करून शुभेच्छा दिल्या आहेत. सदगुरु सेवा समितीच्या-वतीन...

बद्रुद्दीन शेख (कार्य अध्यक्ष), अमर रोडे (सचिव) तसेच सद्दाम हुसेन (संघटक) यांचा सत्कार

इमेज
  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार  बद्रुद्दीन शेख (कार्य अध्यक्ष), अमर रोडे (सचिव) तसेच सद्दाम हुसेन (संघटक) यांचा सत्कार परळी वैजनाथ | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या विविध पदांवर नुकत्याच निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ युवा नेते अमित घाडगे पाटील यांच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन अभिनंदन करण्यात आले. सत्कार करण्यात आलेल्या त्या प्रसंगी पदाधिकाऱ्यांमध्ये तालुकाध्यक्ष बाबा शिंदे, शहराध्यक्ष महादेव गंगणे, परळी नगर परिषदेचे गटनेते नितीन बागवले, नगरसेवक कादर कुरेशी, युवक शहराध्यक्ष सय्यद फिरोज, श्रीनिवास राऊत, बद्रुद्दीन शेख (कोषाध्यक्ष), अमर रोडे (सचिव) तसेच सद्दाम हुसेन (संघटक) यांचा समावेश होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून सर्वसा...
इमेज
आ. धनंजय मुंडे यांचे स्पष्ट निर्देश ; श्रावणापूर्वी परळीतील ८४ खोल्यांचे भक्तनिवास होणार सुरू ! भक्तनिवासाच्या उर्वरित कामांचा कंत्राटदाराला सोबत घेत सर्व संबंधितानी घेतला आढावा परळी वैजनाथ | प्रतिनिधी       बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो शिवभक्तांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेले ८४ खोल्यांचे सुसज्ज भक्तनिवास आगामी श्रावण महिन्यापूर्वी सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या निर्देशानंतर संबंधित यंत्रणांनी भक्तनिवासाच्या उर्वरित कामांचा आढावा घेत नियोजन निश्चित केले आहे.        परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत माजी मंत्री धनंजय मुंडे व ना. पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नातून निधी प्राप्त झाला होता. या निधीतून विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, विविध कारणांमुळे पोलीस स्टेशनजवळ उभारण्यात आलेले ८४ खोल्यांचे भक्तनिवास  अपूर्ण अवस्थेत पडून आहे.या पार्श्वभूमीवर ही बाब धनंजय मुंडे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेत संबं...

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार - नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी

इमेज
एल-निनो परिस्थितीची शक्यता : परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून घेतला आढावा पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार - नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी परळी शहराच्या पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करू- पाणीपुरवठा सभापती सौ.जयश्री गित्ते परळी वैजनाथ, दि. १३ जून — राज्यात यंदा एल-निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत धरणे, तलाव व इतर जलस्रोतां मधील पाणीसाठा यांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या अनुषंगाने आज परळी नगरीच्या नगराध्यक्ष सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी आणि पाणीपुरवठा सभापती सौ. जयश्रीताई रविंद्र गित्ते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वाण प्रकल्पावर जाऊन पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.       भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार एल-निनोचा परिणाम राहण्याची शक्य...

इंदपवाडीच्या शाळेत उत्साहात प्रवेशोत्सव साजरा!

इमेज
  जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊनच अनेक अधिकारी झाले!- नागरगोजे यांचे प्रतिपादन  इंदपवाडीच्या शाळेत उत्साहात प्रवेशोत्सव साजरा! परळी (प्रतिनिधी)  उत्कृष्ट भविष्याची वाटचाल विद्यार्थ्यांनी करावी यासाठी पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच प्रवेश द्यावा असे आवाहन तालुक्याच्या कृषी अधिकारी प्रा डॉ अर्चना नागरगोजे यांनी उपस्थित पालकांना केले.  नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सवाचे आयोजन राज्यभरात करण्यात आले होते. इयत्ता पहिलीला प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करणे, मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करणे, त्यांच्या पावलांची ठसे घेऊन ती कायमस्वरूपी जतन करणे त्याचबरोबर शाळेत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि शालेय गणवेशाचे वाटप करणे अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम होता.  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाची तयारी उत्तम प्रकारे करण्यात आली होती. शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक अशी फुग्यांची कमान उभारण्यात आली होती. इयत्ता सहावी -सातवीच्या वि...
इमेज
परळीतून महायुतीचे उमेदवार बस्वराज पाटील यांना एकगठ्ठा मतदान करण्याचे धनंजय मुंडे यांचे आवाहन महायुतीचे बीड - लातूर - धाराशिवचे उमेदवार बस्वराज पाटील यांनी घेतली धनंजय मुंडे यांची भेट परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - परळी वैद्यनाथ येथील सर्व नगरसेवक यांनी आपले पहिल्या पसंतीचे मत महायुतीचे अधिकृत उमेदवार बस्वराज पाटील यांच्या पाठीशी उभे करावे, असे आवाहन माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आज संपन्न झालेल्या बैठकीत केले आहे.  बीड - लातूर - धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेचे महायुतीचे उमेदवार बस्वराज पाटील यांनी आज धनंजय मुंडे यांची नाथरा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. मुंडे यांनी बस्वराज पाटील यांचे स्वागत केले. तसेच याप्रसंगी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्र पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना मतदानाचे आवाहन केले.  यावेळी युवक नेते अजय मुंडे, दिव्यांग कल्याण महामंडळाचे डॉ. संतोष मुंडे, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, रामेश्वर मुंडे, उपनगराध्यक्ष राजा खाँ पठाण, रवींद्र गित्ते, भावड्या कराड, जयपाल लाहोटी, प्रणव परळीकर यांसह परळी वैद्यना...

४ कि.मी.घोडेस्वारी करत पोहचला शाळेत

इमेज
परळी वैजनाथ: शाळेचा पहिला दिवस: 'पठ्ठयाची' घोड्यावरून शाळेत हटके एन्ट्री! विद्यार्थ्याची हटके सुरुवात ; पहिल्याच दिवशी वेधले सर्वांचे लक्ष  परळी वैजनाथ : प्रतिनिधी....        शाळेचा पहिला दिवस म्हटला की नव्या पुस्तकांचा सुगंध, मित्रांची भेट आणि उत्साहाचे वातावरण असते. पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा होतो या अनुषंगानेच श्री. केदारी महाराज विद्यामंदिर, नंदनज येथे यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. कासारवाडी येथील चि. प्रशांत तुकाराम गुट्टे हा विद्यार्थी थेट घोड्यावर स्वार होऊन शाळेत प्रवेशासाठी आला, त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित पालकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. या विद्यार्थ्याची हटके एण्ट्री पहिल्याच दिवशी  सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली.        आज पासून संपूर्ण शाळा सुरू झाल्या आज शाळेचा पहिला दिवस असल्याने विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सवाची लगबग पाहायला मिळाली. परळी तालुक्यातील नंदनज येथील श्री. केदारी महाराज विद्यामंदिर येथेही विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळाला. शाळेच्...