इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-किरण गित्ते यांच्या नागरी सत्कार व कौतुक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- सुरेश (नाना) फड, प्रदीप खाडे

 किरण गित्ते यांच्या नागरी सत्कार व कौतुक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- सुरेश फड, प्रदीप खाडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत संपूर्ण देशात त्रिपुरा राज्याने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच शहरी आवास योजनेतील उत्कृष्ट कार्याबद्दल मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्रिपुरा सरकार मधील सार्वजनिक बांधकाम, नगर विकास, पर्यटन विभागाचे सचिव तथा बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मा. श्री. किरण गित्ते IAS यांचा नागरी सत्कार व कौतुक सोहळ्याचे आयोजन दिनांक 23 ऑक्टोबर 2022 रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंगमंदिर येथे सायंकाळी 4 वाजता करण्यात आले आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुरेश (नाना) फड, प्रदीप खाडे व नागरी सत्कार समिती परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.


या नागरी सत्कार व कौतुक कौतुक सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून  माजी मंत्री श्री.धनंजयजी मुंडे साहेब,बीड -लातूर -उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ. सुरेशजी धस,   ,भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा. टी. पी.मुंडे सर, माजी विधान परिषद सदस्य संजय दौंड,

तर कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष डॉ. राजारामजी मुंडे, रघुनाथजी खेत्रे सेवानिवृत्त मुख्याध्यापक - जि.प. शाळा आधी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. दिनांक 23 ऑक्टोबर रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे येथे होणाऱ्या या भव्य नागरी सत्कार व कौतुक सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुरेश (नाना) फड, प्रदीप खाडे व नागरी सत्कार समिती परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट