इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-गोपीनाथ गडावर स्मृतिदिन समारंभात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते बालिकापुजन

 गोपीनाथ गडावर स्मृतिदिन समारंभात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते बालिकापुजन 



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी ...

        दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला अलोट गर्दी झाली होती.मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मृतिदिन समारंभ झाला.या समारंभात व्यासपीठावर कार्यक्रमाच्या शिरस्त्याशिवाय नेहमीपेक्षा वेगळा व अभिनव उपक्रम बघायला मिळाला.या समारंभात पाच बालिकांचे व्यासपीठावर शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. 



         मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी दर्शनानंतर ते व्यासपीठावर आले. यावेळी प्रतिमापुजन झाले.त्यानंतर .या समारंभात पाच बालिकांचे व्यासपीठावर शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे,अॅड.यशश्री  मुंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.स्त्री शक्तीची उपासना ही आपली संस्कृती आहे. बालिका पुजनाची आपल्याला मोठी परंपरा लाभलेली आहे.आपल्याकडे नवरात्रीत बालिकापुजनाची विशेष पद्धत आहे. वंचित, पिडित , उपेक्षित घटकांचे व्यासपीठ म्हणून गोपीनाथ गडाच्या व्यासपीठाची ओळख आहे.आज याठिकाणी "संघर्ष सन्मान"म्हणून उपेक्षित, वंचित घटकांसाठी विविध क्षेत्रात सेवाभाव जपुन उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही सन्मानित करण्यात आले.यादृषटीने स्त्री शक्तीचाही सन्मान व्हावा याचे प्रतिक म्हणून व्यासपीठावर बालिकापुजन करण्यात आले.

संबंधित बातम्या........

संघर्ष साहस व सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे गोपीनाथ मुंडे- शिवराजसिंह चौहान* • *ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दाखवा; मार्ग निघतो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंंना चिमटा*


🏵️ *मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं महाराष्ट्राशी आहे 'हे' जिव्हाळ्याचं नाजुक नातं...!*


*काय मिळेल याची चिंता नको: सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढू- पंकजा मुंडे*


*गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे 'वाढप्याच्या' रूपात..!*


🏵️ *लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर उसळला अलोट जनसागर!* • *(क्षणचित्रे व फोटो फिचर)•*


*गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे- हभप रामराव महाराज ढोक*


*धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक*


*मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान -पंकजा मुंडे*


*लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीदिन:पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या