युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं महाराष्ट्राशी आहे 'हे' जिव्हाळ्याचं नाजुक नातं...!

 मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं  महाराष्ट्राशी आहे 'हे' जिव्हाळ्याचं नाजुक नातं...!



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

          मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे आज परळी येथे गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शिवराजसिंह चौहान यांचं  महाराष्ट्राशी  जिव्हाळ्याचं नाजुक नातं असल्याचा उलगडा झाला.

          

        याप्रसंगी आपल्या सात्विक आणि संयमित भाषेत त्यांनी केलेले भाषण सर्वांनाच मोहित करून गेले. त्यांच्या भाषणाची मांडणी आणि धीरोदात्तपणा व आत्मविश्वासपूर्ण शैलीने सर्वांनाच आकर्षित केले. यावेळी भाषण करत असताना त्यांनी काही वाक्ये अस्खलित मराठीतूनही उच्चारली. त्यावेळी त्यांना टाळ्यांची प्रचंड दाद मिळाली. हे बोलत असताना त्यांनी "यहा उपस्थित मेरे भाई- बहन, युवा कार्यकर्ता और मेरे भांजे और भांजियाॅ असा विशिष्ट उल्लेख भाषणाच्या प्रारंभी केला. या मागचं गमक ही त्यांनी सांगितलं की, मी जसा मध्यप्रदेशमध्ये मामा आहे तसा महाराष्ट्राचाही  मामा आहे हे आवर्जून त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्राशी असलेलं आपलं जिव्हाळ्याचं व आत्मिक नातही या सभेत सांगितलं. ते म्हणाले की, मी मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री असलो तरी महाराष्ट्राचा जावई आहे. यामुळे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं महाराष्ट्राशी असलेलं कौटुंबिक, नाजुक नातही सर्वांना कळलं.

संबंधित बातम्या........

संघर्ष साहस व सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे गोपीनाथ मुंडे- शिवराजसिंह चौहान* • *ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दाखवा; मार्ग निघतो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंंना चिमटा*


*काय मिळेल याची चिंता नको: सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढू- पंकजा मुंडे*


*गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे 'वाढप्याच्या' रूपात..!*


🏵️ *लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर उसळला अलोट जनसागर!* • *(क्षणचित्रे व फोटो फिचर)•*


*गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे- हभप रामराव महाराज ढोक*


*धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक*


*मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान -पंकजा मुंडे*


*लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीदिन:पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या