इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'

 धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'




परळी (दि. 04) -  अत्यंत जिव्हाळ्याचा व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या परळी शहर बायपासचे काम  वेगाने सुरू आहे. आज मंत्री धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमासाठी जात असताना, अचानक थांबुन या कामाची पाहणी केली. यावेळी धनंजय मुंडे यांना आपण केलेल्या प्रयत्नांचे फलित पाहून, या रस्त्यावर उभारून सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही! 

Video 



परळी शहर बायपास हा दोन टप्प्यात विभागलेला असून,  पहिल्या टप्प्यात कन्हेरवाडी ते टोकवाडी या चार किलोमीटर लांबीच्या चार पदरी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी 54 कोटी रुपये निधी खर्च अपेक्षित आहे. रेल्वे ओव्हर ब्रिज वगळता सुमारे 80% काम पूर्णत्वाकडे आले आहे. मागील वर्षी 3 जुलै रोजी धनंजय मुंडे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. तर दुसऱ्या टप्प्यात टोकवाडी ते संगम या रस्त्याचे सुमारे पावणे तीन किलोमीटर चे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी शहर बायपासचा एक टप्पा आता पूर्णत्वाकडे आला असून, यामुळे शहरातून होणाऱ्या अवजड वाहतूक व दळणवळण सुविधेत आमूलाग्र सकारात्मक परिणाम होणार आहे. 

या बातम्या देखील वाचा/पहा........

• *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'*


• सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे*


• *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले*


• • *इलेक्ट्रिक बससाठी बीड जिल्ह्यातील सुपुत्राचे योगदान* • *मिलिंद कुलकर्णींनी केले डिझाईन, डेव्हलपिंगचे काम*


*गोपीनाथ गडावर स्मृतिदिन समारंभात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते बालिकापुजन*


• संघर्ष साहस व सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे गोपीनाथ मुंडे- शिवराजसिंह चौहान* • *ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दाखवा; मार्ग निघतो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंंना चिमटा*


•  *मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं महाराष्ट्राशी आहे 'हे' जिव्हाळ्याचं नाजुक नातं...!*


*काय मिळेल याची चिंता नको: सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढू- पंकजा मुंडे*


*गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे 'वाढप्याच्या' रूपात..!*


🏵️ *लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर उसळला अलोट जनसागर!* • *(क्षणचित्रे व फोटो फिचर)•*


*गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे- हभप रामराव महाराज ढोक*


*धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक*


*मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान -पंकजा मुंडे*


*लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीदिन:पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या