MB NEWS-*गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे 'वाढप्याच्या' रूपात..!*

 गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे 'वाढप्याच्या' रूपात..!



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      वंचित, उपेक्षित घटकांसाठी सतत कार्यरत असणाऱ्या भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या लोकांत मिसळण्याच्या व साधेपणाच्या वर्तनाचे नेहमीच प्रसंग  बघायला मिळतात. आज गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे  जेवण वाढताना "वाढप्याच्या" रूपात दिसून आल्या.



        दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित स्मृतिदिन समारंभाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंडे प्रेमिंची अलोट गर्दी झाली होती. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांचीही या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. रामायणाचार्य ह.भ. प. रामराव महाराज ढोक यांचे यावेळी कीर्तन झाले. कीर्तनानंतर उपस्थित सर्वांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सभामंडपामध्ये उपस्थित जनसमुदायाच्या पंगती जेवायला बसल्या आणि या पंक्तीमध्ये पंकजा मुंडे यांनी स्वतः हातात पदार्थ घेऊन पंगतीत वाढायला सुरुवात केली. उपस्थित सर्वांना आग्रहाने खाऊ घालत पंकजाताईं नी स्वतः आपल्या हाताने सर्वांना वाढले. पंकजाताईची ही वाढप्याची भूमिका आजच्या समारंभात लक्षवेधी ठरली.

                             VIDEO 


संबंधित बातम्या........

संघर्ष साहस व सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे गोपीनाथ मुंडे- शिवराजसिंह चौहान* • *ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दाखवा; मार्ग निघतो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंंना चिमटा*


*काय मिळेल याची चिंता नको: सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढू- पंकजा मुंडे*


*गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे- हभप रामराव महाराज ढोक*


*धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक*


*मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान -पंकजा मुंडे*


*लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीदिन:पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार