परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS- (क्षणचित्रे व फोटो फिचर)🏵️लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर उसळला अलोट जनसागर!*)

 


लोकनेत्याच्या अभिवादना साठी गोपीनाथ गडावर उसळला अलोट जनसागर!

*क्षणचित्रे.....
---------




• सकाळी ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचं सुश्राव्य कीर्तनाचा उपस्थित हजारो लोकांनी लाभ घेतला.



• लोकनेत्यास अभिवादन करण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध रितीने मुंडे भक्तांनी समाधीचे दर्शन घेतले.



• वातावरणात  प्रचंड उकाडा असतानाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जनसागर लोटला, त्यातही महिलांचा सहभाग लक्षवेधी




• मुख्यमंत्री चौहान यांचे दुपारी 3.40 वा. मध्यप्रदेश शासनाच्या विशेष हेलिकॉप्टरने गडावर आगमन. पंकजाताई मुंडेंकडून स्वागत




• गडावर येताच मुख्यमंत्र्यांनी लोकनेते मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले.




• बंजारा समाजाच्या महिलांनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत केलेल्या सत्काराने मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान भारावून गेले महिलांनी दिलेला पट्टा त्यांनी कार्यक्रम पुर्ण होईपर्यंत काढला नाही.




• पंकजाताई मुंडे यांनी स्वतः  किर्तनात सहभाग घेऊन हरिनामात तल्लीन झाल्या तर दुपारी पंगतीत वाढपी होत महाप्रसादाचे वाटप केले.



• हजारो नागरिकांनी, अबालवृध्द आणि महिलांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक पंगती बसवण्यात आल्या होत्या.



•मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पाच बालिकांचे "कन्या पूजन" करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.


       
• मुख्यमंत्री चौहान यांचे स्वागत पंकजाताई, खा. डॉ. प्रितमताई आणि अॅड. यशश्रीताई मुंडे यांनी  तुळशीचे रोप देऊन केले.



• मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पंकजाताई, प्रितमताई आणि यशश्रीताई या तिन्ही बहिणींच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.  एका लेकीने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ उभारलेले स्मारक हे पहिल्यांदाच असेल असे म्हटले.



• कार्यक्रमास श्रीमती प्रज्ञाताई मुंडे, आर्यमान पालवे, रासपचे महादेव जानकर, खा. सुजय विखे, भीमराव धोंडे, सुरेश धस, रत्नाकर गुट्टे, राजेश पवार, राधाताई सानप, आर टी देशमुख, बाळासाहेब मुरकुटे, अक्षय मुंदडा, राजेंद्र मस्के, गोविंदराव केद्रे आदींसह अनेक नेते उपस्थित होते.






• कार्यक्रमाचे संचलन ज्ञानदेव काशीद यांनी केले तर प्रवीण घुगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
••••

संबंधित बातम्या........

संघर्ष साहस व सेवा यांचा त्रिवेणी संगम म्हणजे गोपीनाथ मुंडे- शिवराजसिंह चौहान* • *ओबीसींना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दाखवा; मार्ग निघतो- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंंना चिमटा*


*काय मिळेल याची चिंता नको: सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढू- पंकजा मुंडे*


*गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे 'वाढप्याच्या' रूपात..!*


*गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे- हभप रामराव महाराज ढोक*


*धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक*


*मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान -पंकजा मुंडे*


*लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीदिन:पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!