युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS-_गोपीनाथ गडावर अलोट गर्दी;ढोक महाराजांच्या किर्तनाने स्मृती समारंभ सुरू; हरिनामाचा गजर_

 _गोपीनाथ गडावर अलोट गर्दी;ढोक महाराजांच्या किर्तनाने स्मृती समारंभ सुरू; हरिनामाचा गजर_ 

 


*गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे- हभप रामराव महाराज ढोक* 



परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा....

       दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आज सकाळपासूनच गोपीनाथ गडावर अलोट गर्दी झाली आहे. स्मृतिदिनानिमित्त आयोजित समारंभास  रामायणाचार्य रामराम ढोक महाराज यांच्या कीर्तनाने सुरुवात झाली.गोपीनाथ गडावर अलोट गर्दी झाली आहे.हरिनामाच्या गजराने गोपीनाथ गड दुमदुमून गेला आहे.



        लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी वारकऱ्यांवर प्रेम केले आहे , गोपीनाथराव मुंडे जाऊन 8 वर्ष झाले तरी विश्वास बसत नाही, गोपीनाथराव मुंडे हे अनाथाचे नाथ होते, असे भावोद्गार हभप रामनाचार्य  रामराव ढोक महाराज यांनी व्यक्त केले. तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कीर्तन समारंभात ते बोलत होते. ढोक महाराज पुढे म्हणाले, गोपीनाथराव मुंडे आपल्यात नसले तरी माजीमंत्री पंकजा व खासदार प्रीतम मुंडे यांच्या स्वरूपात ते कायम दिसतात. पंकजा मुंडे या झाशीच्या राणी सारख्या आहेत.त्यांच्या कर्तृत्वाला शक्ती मिळाली पाहिजे. सुर्योदय  व सुर्यास्त या नैसर्गिक घटना सारखे प्रत्येकाचे जीवन मरण ठरलेले आहे. मात्र, गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे आहे. गोपीनाथराव वारकऱ्यांना ते वारकरी दिसत, साधकाला ते माय बाप तर अनाथला ते नाथ दिसत होते, अशा शब्दात ढोक महाराज यांनी स्व. मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. 



          या कार्यक्रमास श्रीमती प्रज्ञा गोपीनाथराव मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे, प्रकाश महाजन, महादेव जानकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत.

संबंधित बातम्या 

*गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे- हभप रामराव महाराज ढोक*


*धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक*


*मध्यप्रदेशात ओबीसींना न्याय: मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा गोपीनाथ गडावर होणार सन्मान -पंकजा मुंडे*


*लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीदिन:पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या