MB NEWS:संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्र संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी



परळी वैजनाथ दि.२३ (प्रतिनिधी)

           येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात स्वच्छता दुत व स्वच्छतेची चळवळ राबवणारे राष्ट्र संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली.

                लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात सुरुवातीला राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, न्यु हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शेंडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ विनोद जगतकर यांनी गाडगेबाबा यांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी श्री.शेंडगे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप संजय देशमुख यांनी केला. कार्यक्रमास प्रा.डॉ प्रविण दिग्रसकर, प्रा.डॉ जोशी, प्रा.इथापे, प्रा.डॉ यल्लावाड, प्रा.डॉ कवडे, प्रा.डॉ देशपांडे, प्रा.डॉ नेरकर, प्रा.फुटके, कार्यालयीन अधिक्षक अनिल पत्की यांच्यासह महाविद्यालयातील प्राधापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

--------------------------------------------------

संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन





          लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी संजय देशमुख यांचा न्यु हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.शेडगे यांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ देऊन महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

------------------------------------------------


------------- video news ----------------


------------- video news ----------------

------------- video news ----------------

------------- video news ----------------


------------- video news ----------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !