इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

दारुची नशा करी जिवनाची दुर्दशा

 दारुच्या नशेत बापाने मुलांच्या डोक्यात लाकडी दांडा मारुन केला खून

माजलगाव शहराजवळील खानपुर येथील घटना 

---------------------------------------------

माजलगाव दि.४(प्रतिनिधी)माजलगाव शहराजवळील खानापूर येथे बापाने लेकाच्या डोक्यात लाकडी बांबुचा पाय घालून खून केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.


   रोहीत गोपाळ कांबळे असे मयत तरूणाचे नाव असून गोपाळ विठ्ठल कांबळे असे आरोपी बापाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत मुलगा आणि आरोपी असलेला बाप या दोघांनाही दारूचे व्यसन होते. दारू आणण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये नेहमीच कुरबुरी व्हायच्या. आठ दिवसांपुर्वीच रोहीत कांबळे याने गळफास घेऊन आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. आज सकाळी दोघेही दारूच्या नशेत असतानाच पुन्हा त्यांच्यात कुरबूर झाली. यावेळी बापाने जवळच पडलेला लाकडी बांबू डोक्यात घालून त्याचा खून केला

घटनास्थळी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल सुर्यतळ, पोलीस पोउपनि आकाश माकणे व इतर इतर पोलीस  कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी घटनास्थ पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून आटक करण्यात आले.

दारुची नशा करी जिवनाची दुर्दशा

गेल्या आठ दिवसात बीड जिल्ह्यात दारूच्या कारणावरून सख्ख्या नात्यातील लोकांचा खून पाडण्याच्या जवळपास आठ घटना घडल्या आहेत. अंबाजोगाईच्या येल्डा येथे मुलाने आपल्या आईचा, तर परळीत पुतण्याने चुलतीच्या नरडीचा ला होता. माजलगावात काही दिवसापुर्वी बाबासाहेब नशेतच केली होती. माजलगावातच एका ढाबा चालकाचा मर्डर करण्यात आला होता. तो देखील दारूच्या बीलावरूनच झालेला होता. आता खानापूर येथील ही घटना देखील दारूच्या नशेतच झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट