इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

विद्यार्थ्यानीवर बलात्कार प्रकरणी शिक्षकास 14 वर्षे सक्त मजुरी व 1 लाखाचा दंड

सरकारी वकील ॲड. लक्ष्मण फड यांचा महत्वपूर्ण युक्तीवाद

अंबाजोगाई, प्रतिनिधी.....
      सन 2019 मध्ये अंबाजोगाई येथील एका शाळेतील शिक्षकाने त्याच शाळेतील एका विद्यार्थ्यानीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती.या प्रकरणाची अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली.या प्रकरणात  पिडीतेस 1 लाख रू. नुकसान भरपाई देण्याचे  न्यायालयाने आदेश दिले असुन आरोपीस 14 वर्षे सक्त मजुरी व 1 लाख 2 हजार रूपयाच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
            या प्रकरणील हकीकत अशी की, अंबाजोगाई येथील खोलेश्वर विद्यालयातील शिक्षक आरोपी शाम वारकड याने त्याच शाळेतील एका विद्यार्थीनीवर बलात्कार केला अशा प्रकारची घटना सन 2019 मध्ये घडली होती. या प्रकरणात पिडीत मुलीच्या आईने फिर्याद देवुन तिच्या मुलीला क्रीडा शिक्षक आरोपी शाम वारकड याने जालना येथे स्पर्धेसाठी खेळावयास घेऊन जावुन अंबाजोगाईत आल्यानंतर तिच्यावर क्रीडा संकुल अंबाजोगाई येथे बलात्कार केला. या प्रकरणाची माहिती कोणास सांगितली तर तुला व तुइ-या आईवडीलांना जिवे मारून टाकुन अशा प्रकारची धमकी दिली. ही बाब पिडीत मुलीच्या शाळेतील वर्तुणुकीतून तिच्या शाळेतील एका शिक्षिकेस लक्षात आली. तसेच मानवलोक या सामाजिक संस्थेतर्फे शाळेमध्ये लहान विद्यार्थीनींना चांगला स्पर्श, वाईट स्पर्श या विषयावर चर्चासत्र आयोजीत करण्यात आले होते. त्यावेळी शाळेतील शिक्षीकेने पिडीत मुलीच्या वर्तुणुकीत झालेला बदलामुळे तिस तिच्या आईवडीलांना घरी घेवुन येण्यास सांगितले व पिडीत मुलीच्या शाळेतील वर्तणुकीत झालेला बदल तिच्या आईवडीलांना सांगितला. त्यावरून पिडीत मुलीच्या आईवडीलांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने आरोपीने तिच्यासोबत दि.17-10-2019 रोजी कुकर्म केल्याचे सांगितले. त्यावरून पिडीत मुलीच्या आईने दि. 18-12-2019 रोजी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यास फिर्याद दिली. त्यावरून गुरनं 545/2019 कलम 354-अ, 376 (एफ) (आय) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी  राहुल धस यांच्याकडे देण्यात आला. त्यावरून तपासअधिकारी यांनी तपास करून आरोपीविरूद्ध  जिल्हा व सत्र न्यायालय अंबाजोगाई येथे दोषारोपपत्र दाखल केले.

     या प्रकरणाचा साक्षीपुरावा चालु झाल्यानंतर सरकार पक्षाच्या वतीनें अँड.लक्ष्मण फड यांनी एकुण 11 साक्षीदार तपासले. त्यात पिडीत मुलगी व फिर्यादी तिची आई या दोघींची साक्ष अत्यंत महत्वाच्या ठरल्या. तर बचाव पक्षाच्या वतीने 2 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीपुरावा संपल्यानंतर दोन्ही बाजुचा न्यायालयात युक्तीवाद पुर्ण केला. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. लक्ष्मण फड यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस 354-अ, 376 (2) (एफ) (आय) व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 4, 8, 12 प्रमाणे दोषी धरून आरोपीस 14 वर्षाची सक्त मजुरी व दंड ठोठावला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील ॲड.लक्ष्मण फड यांनी काम पाहिले तर त्यांना पैरवी म्हणुन गोविंद कदम व बाबुराव सोडगीर यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....