युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

ना.पंकजा मुंडेंचा भाजप प्रदेश कार्यालयात जनता दरबार: जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण

राज्यभरातून नागरिकांची तोबा गर्दी ; प्रत्येकांची गाऱ्हाणी ऐकली 

मुंबई।दिनांक २२।

राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज आयोजित करण्यात आलेला जनता दरबार अक्षरशः हाऊसफुल्ल झाला. राज्यभरातून आपापल्या समस्या घेऊन आलेल्या लोकांनी यावेळी तोबा गर्दी केली होती. प्रत्येक नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधत ना. पंकजाताईंनी त्यांच्या प्रश्नांचा जागेवरच निपटारा केला.


 भाजपच्या वतीने प्रत्येक महिन्याला मंत्री महोदयांचा 'जनता दरबार' हा उपक्रम जाहीर करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत पहिला जनता दरबार घेण्याचा मान ना. पंकजाताई मुंडे यांना मिळाला. आज दुपारी ३ ते ५ वा. दरम्यान ना. पंकजाताईंनी जनता दरबार घेतला. राज्याच्या विविध भागातून आपल्या समस्या घेऊन लोकं आली होती. आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या, त्यांची गाऱ्हाणी ऐकली, निवेदने स्वीकारली आणि त्यांच्या प्रश्नांचे जागेवर निराकरण केले. पर्यावरण व पशुसंवर्धन विभागासह अन्य विभागाची कामे घेऊन आलेल्या कामांचाही त्यांनी यावेळी निपटारा केला. 


   भाजपचा हा उपक्रम खरोखरच स्त्युत्य असा आहे, या पहिल्याच जनता दरबाराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्व सामान्य जनतेशी थेट संवाद  साधता आला असं जनता दरबार झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या