ढाबा चालकाचा माजलगाव मध्ये खून
माजलगाव दि. २० (प्रतिनिधी):- माजलगाव तालुक्यात गुंडगिरीने थैमान घातले आहे. एक घटना संपते ना संपते तोच दुसरी घटना चर्चेला उधाण आणते. अशीच एक घटना घडली.
राष्ट्रीय महामार्ग -६१ वरील माजलगाव पाथरी मार्गावर असलेल्या माजलगाव शहरा पासुन ४ किमी अंतरावर नागडगाव पाटी कॉनर्र वरील गावरान ढाबा मालक महादेव गायकवाड (५४ वर्षे) रा. मंजरथ रोड माजलगाव यांच्या वर २० एप्रिल रोजीच्या संध्याकाळी ७.३० ढाब्यावर बसलेल्या माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील ग्राहकांनी बीला च्या कारणाने डोक्यावर वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात ढाबा मालकाचा मुलगा (२२वर्षे) याच्या वर पण हल्ला केल्याची माहिती समजली आहे.
दरम्यान अत्यवस्थ महादेव गायकवाड यांना माजलगाव शहरातील डॉ. गिलबिले यांच्या बायपास रोड वर असलेल्या संजीवनी हॉस्पीटल मधे दाखल केले होते. त्यानंतर काही तासाने संजीवनी हॉस्पीटल चे प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर गिलबिले यांनी शेवटच्या टप्प्यात सल्ला दिला की, महादेव गायकवाड यांना संभाजीनगर येथे हलविले गरजेचे आहे, त्यावर महादेव गायकवाड यांना संभाजीनगर येथे हलवले. तर मुलगा आशुतोष महादेव गायकवाड यांचे सिटी स्कैन करण्यात आले असुन त्याची प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यान महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा