इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

पर्यावरण वाचवा-वसुंधरा सजवा.....

झाडे हीच आपली खरी जीवनवाहिनी : विद्यानिकेतन स्कूलने राबवला वसुंधरा दिनाचा आगळावेगळा उपक्रम ! 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    शहरातील विद्यानिकेतन स्कूलने जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम राबवून पर्यावरण विषयक जनजागृतीचा संदेश दिला.झाडे हीच आपली खरी जीवनवाहिनी हा संदेश यानिमित्ताने विद्यार्थी व पालकांना देण्यात आला.

     परळी शहरातील विद्यानिकेतन स्कूल यांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण विषयक जाणीव जागृती व्हावी या दृष्टिकोनातून अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी व पालक यांच्यात जाणीव निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या पालकांमध्येही पर्यावरण विषयक संवेदना निर्माण करण्यासाठी विविध रोपट्यांचे वितरण करण्यात आले. परंतु हे वितरण करत असताना झाड आणि झाडापासून माणसाला प्राप्त होणाऱ्या ऑक्सिजन निर्मितीचा संदेश दृढ व्हावा या दृष्टिकोनातून झाड आणि ऑक्सिजन किट प्रदर्शित करत  रोपट्यांचे वितरण करण्यात आले. पर्यावरण रक्षण करण्याचा एक आगळावेगळा संदेश या माध्यमातून देण्यात आला. विद्यानिकेतन स्कूलने वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या या उपक्रमाचे पालकातून कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या