इमेज
  ८० पेक्षा अधिक स्पर्धकांतून आनंद वाव्हळे ठरले अव्वल गायक पुणे (खराडी): दिनांक ५ एप्रिल २०२६, रविवार रोजी सारनाथ बुद्ध विहार, खराडी (पुणे) येथे मराठी/हिंदी गीत गायन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सदर स्पर्धा कराओके ट्रॅकवर आधारित असून पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील विविध भागांतून ८० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली असून प्रत्येक स्पर्धकाने आपली गायनकला प्रभावीपणे सादर केली. या स्पर्धेत आनंद वाव्हळे यांनी आपल्या सुरेल आणि प्रभावी गायनाने परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अनुराधा डंबाळे यांनी मिळवला, तर प्रसाद उलांडे आणि गोविंद कांबळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या आनंद वाव्हळे यांचा सारनाथ बुद्ध विहार येथील महिला संघाच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांचे प्राचार्य अनिल शिंदे व प्राध्यापिका शुभांगी शिंदे, यश भोरे ,किशोर भोरे व अनंत पवार ,रणजीत गोदाम,अंकुश सावंत ,नितीन मोहिते रामेश्वर बचाटे व शेखर जाधव यांनी कौतुक करून पुढील वा...

जीवनविद्या मिशन' शाखा परळी च्या वतीने उत्साहात प्रवचन कार्यक्रम

 'जीवनविद्या मिशन' शाखा परळी च्या वतीने उत्साहात प्रवचन कार्यक्रम



विचारांच्या सामर्थ्यातूनच राष्ट्रहित आणि विश्वशांती शक्य – नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी



माणसाचे जीवन हे त्याच्या विचारांचे प्रतिबिंब -डॉ. सौ. प्रतिमा संखे



परळी वैजनाथ (प्रतिनिधी): 

     विचारांचे सामर्थ्य मोठे असते. सकारात्मक आणि राष्ट्रहित जपणाऱ्या विचारांतूनच आदर्श समाज निर्माण होऊ शकतो. डॉ. सौ. प्रतिमा संखे यांचे मार्गदर्शन परळीकरांसाठी वैचारिक मेजवानी ठरले असे प्रतिपादन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले. तर यावेळी प्रमुख मार्गदर्शन करतानाव सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या शिष्या डॉ. सौ. प्रतिमा संखे यांनी माणसाचे जीवन हे त्याच्या विचारांचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन केले.

          परळी वैजनाथ येथील आर्यसमाज मंदिरात जीवनविद्या मिशन, मुंबई शाखा परळी वैजनाथ  यांच्या वतीने आयोजित 'विचारांचे सामर्थ्य मोठे' या विषयावरील प्रवचन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. थोर समाज सुधारक सद्गुरू वामनराव पै यांच्या शिष्या आणि २०२२ च्या युपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांच्या मातोश्री डॉ. सौ. प्रतिमा संखे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजक रमाकांतअप्पा निर्मळे यांनी प्रास्ताविकात या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. डॉ. प्रतिमा संखे यांनी आपल्या प्रवचनातून 'प्रत्येक कृती राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची' असा संदेश देत जीवनविद्या मिशनच्या तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकला. 

        यावेळी सविस्तर मार्गदर्शन करताना डॉ. सौ. प्रतिमा संखे यांनी सांगितले की,माणसाचे जीवन हे त्याच्या विचारांचे प्रतिबिंब असते. जर आपले विचार शुद्ध, विधायक आणि राष्ट्रहिताचे असतील, तर आपली प्रत्येक कृती आपोआपच समाज कल्याणाकडे वळते. सद्गुरु  वामनराव पै यांनी दिलेला 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हा मंत्र केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नसून, तो विश्वशांतीचा मार्ग दाखवणारा आहे. जेव्हा आपण स्वार्थाकडून परार्थाकडे जातो, तेव्हाच खऱ्या अर्थाने विचारांचे सामर्थ्य प्रकट होते. त्यामुळे या विचारांचे अनुकरण सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. 

      यावेळी बोलताना नगराध्यक्ष सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितले की, सद्गुरु वामनराव पै यांचे विचार हे जीवनाला देशा देणारे विचार आहेत. जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून परळी शहरात अशा प्रकारच्या प्रबोधनात्मक मार्गदर्शनाने निश्चितच जीवनाची एक दिशा आणि मार्ग सापडणार आहे.आजचा हा कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने वैचारिक मेजवानीच ठरला असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला परळी शहरातील नागरिक, महिला आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमाकांतअप्पा निर्मळे, त्यांचे मित्र मंडळ व जीवन विद्या मिशन शाखा परळी वैजनाथ यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....