मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज बांधव उपस्थित...
परळीत ‘गो सन्मान आव्हान अभियान’ अंतर्गत तहसीलदारांना निवेदन सादर; गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्याची मागणी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी:
देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘गो सन्मान आव्हान अभियान’ अंतर्गत आज परळी वैजनाथ येथे विविध हिंदुत्ववादी संघटना आणि गो-प्रेमींच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. गोमातेला 'राष्ट्रमाता' घोषित करावे आणि गोवंश हत्या बंदीसाठी कठोर केंद्रीय कायदा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे अभियान देशातील ५००० हून अधिक तहसील कार्यालयांत] एकाच वेळी राबविण्यात आले.
परळी शहरात सकाळी या अभियानानिमित्त औद्योगिक वसाहत सभागृहापासून शांततामय मार्गाने पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर गो-भक्तांनी एकत्रितपणे तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या निवेदनात प्रामुख्याने गोमातेला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असल्याने तिला अधिकृतपणे 'राष्ट्रमाता' म्हणून घोषित करावे.,,संपूर्ण देशात गोवंश हत्या पूर्णपणे बंद करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा अमलात आणावा:,बेवारस आणि वृद्ध गोवंशाच्या संगोपनासाठी असलेल्या गोशाळांना शासकीय मदत मिळावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.हा लढा केवळ भावनिक नसून तो भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या रक्षणासाठी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या अभियानाला परळी परिसरातील जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी सकल हिंदू समाज बांधव, भगिनी,परळीतील अध्यात्मिक क्षेत्रातील महाराज मंडळीआणि स्थानिक गो-प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा