इमेज
  ८० पेक्षा अधिक स्पर्धकांतून आनंद वाव्हळे ठरले अव्वल गायक पुणे (खराडी): दिनांक ५ एप्रिल २०२६, रविवार रोजी सारनाथ बुद्ध विहार, खराडी (पुणे) येथे मराठी/हिंदी गीत गायन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सदर स्पर्धा कराओके ट्रॅकवर आधारित असून पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील विविध भागांतून ८० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली असून प्रत्येक स्पर्धकाने आपली गायनकला प्रभावीपणे सादर केली. या स्पर्धेत आनंद वाव्हळे यांनी आपल्या सुरेल आणि प्रभावी गायनाने परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अनुराधा डंबाळे यांनी मिळवला, तर प्रसाद उलांडे आणि गोविंद कांबळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या आनंद वाव्हळे यांचा सारनाथ बुद्ध विहार येथील महिला संघाच्या हस्ते सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्यांचे प्राचार्य अनिल शिंदे व प्राध्यापिका शुभांगी शिंदे, यश भोरे ,किशोर भोरे व अनंत पवार ,रणजीत गोदाम,अंकुश सावंत ,नितीन मोहिते रामेश्वर बचाटे व शेखर जाधव यांनी कौतुक करून पुढील वा...

अंबाजोगाईत भीषण अपघात: शिवाई बसच्या धडकेत २० वर्षीय तरुणाचा जागीच अंत..


अंबाजोगाई: तालुक्यातील धानोरा खुर्द येथील २० वर्षीय तरुण अथर्व महादेव ढगे याचा भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. 

   धानोरा येथून अंबाजोगाईकडे येत असताना लोखंडी सावरगाव नजीक अथर्व आणि समोरून येणाऱ्या अंबाजोगाई - संभाजीनगर शिवाई बसची (क्रमांक एमएच ४९ बीझे ९५८१) जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की गंभीर दुखापतीमुळे अथर्वचा जागीच प्राण गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना पाचारण केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ऐन तारुण्यात अथर्वचा असा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण धानोरा खुर्द परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....