कळंबच्या नगराध्यक्षा सुनंदाताई कापसे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन
शेतकरी व कष्टकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी वैद्यनाथा चरणी केली प्रार्थना
परळी वैजनाथ | प्रतिनिधी...
अधिकमासाच्या पवित्र पावन पर्वाचे औचित्य साधत कळंब नगरीच्या नगराध्यक्षा तथा शिवसेना (शिंदे गट) नेत्या सौ. सुनंदाताई शिवाजीआप्पा कापसे यांनी श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथे भेट देऊन बारा ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पूजा-अर्चना करून राज्यातील जनतेच्या आरोग्य, सुख-समृद्धी तसेच शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. सौ. सुनंदाताई कापसे यांनी कळंब शहरातील सुमारे ५१ महिला भक्तांसमवेत वैद्यनाथ धाम यात्रा पूर्ण केली.
याबाबत अधिक माहिती असते, सध्याला पुरुषोत्तम मासाचे पावन सर्व सुरू आहे. भारतीय धार्मिक पुरुषोत्तम मासास अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचे औचित्य साधत अधिकमासाच्या धार्मिक वातावरणात कळंबच्या प्रथम नागरिक सौ. सुनंदा शिवाजीआप्पा कापसे यांनी महिला माता-भगिनींसह भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी सर्वांच्या मंगलमय जीवनासाठी साकडे घातले.
यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, सर्वांना सुख-समाधान लाभावे तसेच बळीराजाच्या जीवनात समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली. आगामी पावसाळ्यात चांगला व समाधानकारक पाऊस होऊन, शेतकऱ्यांची शिवार हिरवाईने भरून यावीत, बळीराजाच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, असे साकडे त्यांनी प्रभू वैद्यनाथास घातले.
तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा सर्वांगीण विकास होऊन सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद, समृद्धी व प्रगतीचे दिवस यावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
या धार्मिक यात्रेत नगराध्यक्ष सौ सुनंदाताई कापसे यांच्या समवेत सौ. अपर्णा टेळे, हिरा यादव, स्वाती घुले, श्रीमती वनमाला खापे, कल्पना सोनवणे, सीमा थोरात, सौ. जान्हवी खापे, कल्पना चाळक, यांच्यासह कळंब नगरीतील अनेक महिला भक्त, माता-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पुरुषोत्तम मासाच्या पावन पर्वात पार पडलेल्या वैद्यनाथ धाम यात्रेच्या निमित्ताने सर्व माता भगिनी तथा फक्त गणामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा