युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

MB NEWS:प्रतिभा प्रशांत फडचे दहावीच्या परीक्षेत यश:वडिलधारी मंडळींकडून सत्कार

प्रतिभा प्रशांत फडचे  दहावीच्या परीक्षेत यश:वडिलधारी मंडळींकडून सत्कार 




परळी वैजनाथ (प्रतिनिधी)येथील न्यु हायस्कूल थर्मल काँलनी ची विद्यार्थिनी कु.प्रतिभा प्रशांत फड हिने दहावीच्या बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवले असून ९८% टक्के गुणांसह उत्तीर्ण झाली आहे.


या यशाबद्दल कु.प्रतिभा फड हिचा सत्कार पेढे भरवून , पुष्पगुच्छ देऊन करताना संत वाड्.मयाचे संशोधक ॲड दत्तात्रय महाराज आंधळे, श्री.बापुराव नागरगोजे तंटामुक्ती अध्यक्ष संगम, श्री विलासराव वेदपाठक सेवानिवृत्त तंत्रज्ञ वैद्यकीय विभाग ग्रामीण रुग्णालय परळी ,श्रीमहादेव कातकडे, श्रीशिवाजीराव माळी, श्रीअशोकराव भोसले,तसेच प्रतिभाचे आजोबा सेवानिवृत्त कर्मचारी श्री सायसराव फड व शाळेतील शिक्षकांनी, नातेवाईकांनी अभिनंदन व कौतुक केले.या यशाबद्दल सर्वत्र प्रतिभा चे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या