डाॅ. संतोष मुंडे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

 बीड जिल्ह्य़ातील दिव्यांगांचा नगर परिषद, नगर पंचायत व ग्राम पंचायतचा 5 टक्के निधी वाटप करावा




डाॅ. संतोष मुंडे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी


परळी वैजनाथ

      बीड जिल्ह्य़ातील दिव्यांगांचा नगर परिषद, नगर पंचायत व ग्राम पंचायतचा 5 टक्के निधी त्वरीत वाटप करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

       यासंबंधी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व दिव्यांगांना सहकार्य म्हणून नगर परिषद, नगर पंचायत व ग्राम पंचायत यांच्यावतीने 5 टक्के निधी दिला जातो .यामुळे दिव्यांगांना आधार मिळतो आणि गरजही भागते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अपंगांचा हा निधी दिला गेलेला नाही यामुळे दिव्यांगांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. तरी दिव्यांगांची गरज लक्षात घेऊन नगर परिषद, नगर पंचायत व ग्राम पंचायतचा 5 टक्के निधी त्वरीत वाटप करण्यात यावा अशी मागणी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ .संतोष मुंडे यांनी आज बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार