पोस्ट्स

१०८ वाचकांकडून दररोज हनुमान चालीसा पारायण.

इमेज
धर्मापुरीत ‘अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा’ ज्ञानयज्ञास उद्यापासून प्रारंभ १०८ वाचकांकडून दररोज हनुमान चालीसा पारायण. परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : तालुक्यातील धर्मापुरी येथील जागृत देवस्थान श्री रोकडेश्वर मंदिरात श्रीराम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त भव्य ‘अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व हनुमान चालीसा पारायण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, २६ मार्च रोजी दुपारी २ वाजता या भक्तिमय सोहळ्याचा शुभारंभ होणार असून परिसरात आधीच धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ख्यातनाम ह.भ.प. भागवताचार्य कांतादेव महाराज (दादाहरी वडगावकर) यांच्या रसाळ वाणीतून सादर होणारी ‘श्रीमद् भागवत कथा’ होय. दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत कथा होणार असून अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत भाविकांना सखोल कथाश्रवणाचचा मिळणार आहे. सप्ताहानिमित्त कीर्तन महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे. दररोज रात्री ८ ते १० या वेळेत ह.भ.प. लिंबाजी महाराज आळंदीकर, ह.भ.प. श्रीकांतजी महाराज आळंदीकर, ह.भ.प. सुशांत मह...

स्वागताची तयारी....२० मिनिटांत महास्वामीजींचे होणार आगमन..

इमेज
  म्हैसूर मठाचे पीठाधिपती, जगद्गुरू परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांचे काही वेळातच वैद्यनाथ नगरीत होणार आगमन परळीत अध्यात्मिक पर्वणी, दिव्य दर्शन योग: भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) –         येडतोर येथील श्री योगानंदेश्वर सरस्वती मठ, म्हैसूरचे पीठाधिपती जगद्गुरू परमपूज्य श्री श्री शंकर भारती महास्वामीजी यांच्या आगमनानिमित्त परळी वैजनाथ येथे आज दि.२३ रोजी अध्यात्मिक पर्वणी व दिव्य दर्शन योग घडणार आहे. यानिमित्त स्वागत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सर्व धर्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सकल हिंदू समाज, परळी वैजनाथ’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.        शृंगेरी शारदापीठाच्या अद्वैत परंपरेतील या महान विभूतींचे सोमवार, दि. २३ मार्च २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता परळी वैजनाथ येथे आगमन होणार आहे. आगमनानंतर ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिर येथे विधीवत पूजा व दर्शन घेणार आहेत. महास्वामीजींच्या स्वागतासाठी शहरात ...
इमेज
  परळी उपजिल्हा रुग्णालयात अल्पवयीन पीडितेच्या तपासणीला विलंब :वैद्यकीय अधीक्षकांनी संवेदनशीलता दाखवत संबंधितांना काढली नोटीस परळी वैजनाथ,(प्रतिनिधी) : परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात  अल्पवयीन पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणीस काही तास विलंब झाल्याचा प्रकार समोर आला. याबाबत प्रसार माध्यमातून बातम्याही आल्या. या  प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संवेदनशीलता दाखवत वैद्यकीय अधीक्षक डाॅ.अरुण गुट्टे यांनी तात्काळ  संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना  कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.       धर्मापुरी येथील १० वर्षीय बालिका हिला पोस्को अंतर्गत गुन्ह्याच्या अनुषंगाने ग्रामीण पोलिसांकडून वैद्यकीय तपासणीसाठी दि. २२ मार्च २०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, त्या वेळी रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने पीडितेला तब्बल आडीच तास प्रतीक्षा करावी लागली. या गंभीर प्रकाराची बातमी वृत्तमाध्यमांत प्रकाशित झाली. गंभीर प्रकरण व त्याबाबतची अनास्था अधोरेखित झाली.त्यामुळे संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरुण गुट्टे यांनी या...

पैशाचा वाद...सिरसाळा पोलीस हद्दीतील घटना...

इमेज
  जातीवाचक शिवीगाळ व छळाला कंटाळून मजुराची आत्महत्या; एकावर गुन्हा दाखल परळी वैजनाथ,पुढारी वृत्तसेवा –     पैशाच्या कारणावरून वारंवार जातीय शिवीगाळ व दमदाटी सहन करावी लागल्याने नैराश्यात जाऊन एका मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यातील पौळ पिंपरी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत कुंडलीक पिराजी वैराळ (रा. पौळ पिंपरी, ता. परळी वैजनाथ) यांनी दि. 20 मार्च 2026 रोजी रात्री 11 वा. ते दि. 21 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान आरोपी राम महादेव पौळ यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेप्रकरणी मयताची पत्नी शांताबाई कुंडलीक वैराळ (वय 55, व्यवसाय मजुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी राम महादेव पौळ (रा. पौळ पिंपरी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 108, 352 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्...
इमेज
  नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा - गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण आरएसएसचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सरिता गंगाधरराव फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन, नागपूर द्वारा निर्मित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे आज नागपूर येथे लोकार्पण पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.  या डायग्नोस्टिक सेंटरच्या उभारणीसाठी आमदार संदीप जोशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या परिश्रमांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच अल्पावधीत उभ्या राहिलेल्या केंद्राला स्व. गंगाधरराव फडणवीस यांचे नाव देण्यात आले असून वडिलांच्या कार्याचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडल्याचे आणि त्यांच्याकडून समाजकार्याची प्रेरणा मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आरोग्य तपासण्यांसाठीची आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असून लोकांना माफक दरात आरोग्यसेवा दिली जाणार आहे. तसेच राज...
इमेज
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार दत्ता मेघे यांचे निधनः दाता,आधारवड गेल्याची भावना! विदर्भातील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार दत्ता राघोबाजी मेघे (वय ८९) यांचे रविवारी दिनांक २२ मार्च रोजी नागपूर येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. दत्ताजी मेघे हे विदर्भातील प्रभावी व दूरदृष्टीचे नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत लोकसभा खासदार म्हणून जनतेचे प्रतिनिधित्व केले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी, विशेषतः शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सावंगी मेघे येथे भव्य रुग्णालयाची स्थापना केली. त्यांच्या कार्यकाळात विदर्भातील अनेक विकासकामांना गती मिळाली. राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी शिक्षण संस्थांची उभारणी करून ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या अनेक शैक्षणिक व वैद्यकीय संस्था आजही समाजसेवेचे कार्य करत आहेत. त्यामुळे ते केवळ राजका...
इमेज
  अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अपहरणाची तक्रार दाखल परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : शहरातील १४ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भीमनगर, परळी वैजनाथ भागातील रहिवाशी महिलेने आपली मुलगी बेपत्ता असुन तिचे आपहरण झाल्याचा संशय व्यक्त करून परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्या मागील १५ वर्षांपासून आपल्या दोन मुलींसह आईकडे माहेरी राहतात. दि. १९ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास त्यांची मोठी मुलगी (वय १४ वर्षे ११ महिने, इयत्ता ९ वी) ही घरातून कोणालाही काही न सांगता बाहेर गेली. बराच वेळ उलटूनही ती घरी परत न आल्याने, कुटुंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईक, मैत्रिणी व शाळेत शोध घेतला; मात्र ती आढळून आली नाही. यापूर्वीही संबंधित मुलगी घरातून न सांगता गेल्याची घटना घडली होती, परंतु त्यावेळी ती नातेवाईकांकडे सापडली होती. मात्र यावेळी ती सापडत नसल्याने, कोणीतरी अज्ञात इसमाने त...

विकृती....गुन्हा दाखल

इमेज
  अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल परळी वैजनाथ: प्रतिनिधी....  एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धर्मापुरी येथील रहिवासी आरोपीविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धर्मापुरी ता.परळी वैजनाथ येथे १८ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ५० वर्षीय  आरोपीने पीडित १० वर्षीय एका अल्पवयीन मुलीवर दोन वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर, ही बाब कोणाला सांगितल्यास पीडित मुलगी आणि तिच्या फिर्यादी पालकांना जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून २२ मार्च २०२६ रोजी  बालाजी पांचाळ या आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ६४(१), ६४(२), ६५(२), ७४, ७५(२) आणि पोक्सो  कायद्याच्या ४, ६, ८, १२ कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास अंबाजोगाईच्या पिंक पथकातील ए.पी.आय. जाधवर  करत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.मह...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!