विकृती....गुन्हा दाखल

 अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल


परळी वैजनाथ: प्रतिनिधी....

 एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धर्मापुरी येथील रहिवासी आरोपीविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धर्मापुरी ता.परळी वैजनाथ येथे १८ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ५० वर्षीय  आरोपीने पीडित १० वर्षीय एका अल्पवयीन मुलीवर दोन वेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. एवढेच नव्हे तर, ही बाब कोणाला सांगितल्यास पीडित मुलगी आणि तिच्या फिर्यादी पालकांना जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून २२ मार्च २०२६ रोजी  बालाजी पांचाळ या आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ६४(१), ६४(२), ६५(२), ७४, ७५(२) आणि पोक्सो  कायद्याच्या ४, ६, ८, १२ कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास अंबाजोगाईच्या पिंक पथकातील ए.पी.आय. जाधवर  करत आहेत. आरोपीला अटक करण्यात आली आहे.महिला व बालकांवरील अत्याचाराच्या या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!