परळी उपजिल्हा रुग्णालयात अल्पवयीन पीडितेच्या तपासणीला विलंब :वैद्यकीय अधीक्षकांनी संवेदनशीलता दाखवत संबंधितांना काढली नोटीस
धर्मापुरी येथील १० वर्षीय बालिका हिला पोस्को अंतर्गत गुन्ह्याच्या अनुषंगाने ग्रामीण पोलिसांकडून वैद्यकीय तपासणीसाठी दि. २२ मार्च २०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, त्या वेळी रुग्णालयात एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने पीडितेला तब्बल आडीच तास प्रतीक्षा करावी लागली. या गंभीर प्रकाराची बातमी वृत्तमाध्यमांत प्रकाशित झाली. गंभीर प्रकरण व त्याबाबतची अनास्था अधोरेखित झाली.त्यामुळे संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरुण गुट्टे यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये रुग्णसेवेत टाळाटाळ, अनधिकृतपणे मुख्यालय सोडणे आणि जबाबदारीत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरांना २४ तासांत लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश या नोटिसीतून देण्यात आले आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा