#जोशींचीतासिका....भाग १

इमेज
  आरोग्यम धनसंपदा : उपचार की व्यापार? भाग १ #जोशींचीतासिका  शीर्षटिप : माझे काही नातेवाई, मित्र मैत्रिणी, स्नेही वैद्यकीय क्षेत्रात (शासकीय व खाजगी) कार्यरत आहेत. त्यामुळे कोणतेही सरसकटीकरण करणारा हा लेख नाही. सन्माननीय अपवाद वगळता वैद्यकीय क्षेत्र कसे आहे हे आपण सारे जाणतोच. सिनेमा पडद्यावर, क्रूरता परळीच्या भूमीवर परळी वैजनाथमध्ये नुकतीच एक गंभीर घटना समोर आली आहे. अक्षय कुमारच्या "गब्बर इज बॅक" चित्रपटाप्रमाणे मृत भ्रूण मातेच्या पोटात २२ तास ठेऊन त्या कुटुंबांची आर्थिक लूट केल्याचा आरोप होत आहे. तशी तक्रार पीडित कुटुंबाने सरकार दरबारी दाखल केली आहे. त्यानुषंगाने आज हा लेखनप्रपंच जो फक्त परळी वैजनाथपुरता मर्यादित नसून सर्वत्र कमी अधिक प्रमाणात लागू होऊ शकतो. कोणाच्याही घरी वैद्यकीय अडचण निर्माण झाली की सारं घर हैराण होत. त्या कुटुंबातील व्यक्तींची शारीरिक, मानसिक व आर्थिक हेळसांड होते. तालुक्यापासून मुंबईपर्यंत: रुग्णाचा जीवघेणा प्रवास आपल्या इथले शासकीय दवाखाने सक्षम नाहीत म्हणून रुग्ण प्रथम इथल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जातात. तिथे काही काळ उपचारानंतर हजारो, लाखोंचे...

 अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अपहरणाची तक्रार दाखल



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : शहरातील १४ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भीमनगर, परळी वैजनाथ भागातील रहिवाशी महिलेने आपली मुलगी बेपत्ता असुन तिचे आपहरण झाल्याचा संशय व्यक्त करून परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्या मागील १५ वर्षांपासून आपल्या दोन मुलींसह आईकडे माहेरी राहतात. दि. १९ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास त्यांची मोठी मुलगी (वय १४ वर्षे ११ महिने, इयत्ता ९ वी) ही घरातून कोणालाही काही न सांगता बाहेर गेली. बराच वेळ उलटूनही ती घरी परत न आल्याने, कुटुंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईक, मैत्रिणी व शाळेत शोध घेतला; मात्र ती आढळून आली नाही.

यापूर्वीही संबंधित मुलगी घरातून न सांगता गेल्याची घटना घडली होती, परंतु त्यावेळी ती नातेवाईकांकडे सापडली होती. मात्र यावेळी ती सापडत नसल्याने, कोणीतरी अज्ञात इसमाने तिला अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून मुलीचा शोध सुरू आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....