इमेज
  नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा - गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण आरएसएसचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सरिता गंगाधरराव फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन, नागपूर द्वारा निर्मित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे आज नागपूर येथे लोकार्पण पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.  या डायग्नोस्टिक सेंटरच्या उभारणीसाठी आमदार संदीप जोशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या परिश्रमांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच अल्पावधीत उभ्या राहिलेल्या केंद्राला स्व. गंगाधरराव फडणवीस यांचे नाव देण्यात आले असून वडिलांच्या कार्याचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडल्याचे आणि त्यांच्याकडून समाजकार्याची प्रेरणा मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आरोग्य तपासण्यांसाठीची आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असून लोकांना माफक दरात आरोग्यसेवा दिली जाणार आहे. तसेच राज...

भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार दत्ता मेघे यांचे निधनः दाता,आधारवड गेल्याची भावना!






विदर्भातील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार दत्ता राघोबाजी मेघे (वय ८९) यांचे रविवारी दिनांक २२ मार्च रोजी नागपूर येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
दत्ताजी मेघे हे विदर्भातील प्रभावी व दूरदृष्टीचे नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत लोकसभा खासदार म्हणून जनतेचे प्रतिनिधित्व केले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी, विशेषतः शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सावंगी मेघे येथे भव्य रुग्णालयाची स्थापना केली. त्यांच्या कार्यकाळात विदर्भातील अनेक विकासकामांना गती मिळाली.

राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी शिक्षण संस्थांची उभारणी करून ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या अनेक शैक्षणिक व वैद्यकीय संस्था आजही समाजसेवेचे कार्य करत आहेत. त्यामुळे ते केवळ राजकारणी नव्हे, तर समाजसेवक म्हणूनही जनमानसात लोकप्रिय होते.

दत्ता मेघे यांचा स्वभाव साधा, लोकाभिमुख आणि कार्यपद्धती पारदर्शक होती. सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी ते ओळखले जात. त्यामुळे त्यांना सर्वपक्षीय आदर लाभला होता. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांसह मोठा राजकीय व सामाजिक वारसा आहे. त्यांच्या निधनाने विदर्भाने एक अनुभवी, अभ्यासू आणि जनतेशी नाळ जुळलेला नेता गमावला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, अशा भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत.
गरीब परिस्थितीतून पुढे आलेले दत्ता मेघे यांनी विदर्भातील राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसमध्ये केली. त्यांनी वर्धा,रामटेक, नागपूर लोकसभा मतदार संघातून चार वेळा प्रतिनिधित्व केले. राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले. ते ३ वेळा विधान परिषद सदस्य,मंत्रीही होते. २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पुलोद सरकारमध्ये ते विदर्भातून मंत्री होते. १९९१ मध्ये त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजय संपादन केला. यानंतर रामटेक (१९९६ व वर्धा (१९९८) या मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते आहेत. वर्धा येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून त्यांनी विदर्भात अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या आहेत.

दत्ता मेघेच्या मृत्यूपत्रात नितीन गडकरी यांचे नाव

राजकारणात अनेक व्यक्ती नात्यापलीकडच्या असतात. त्यांच्यावर प्रचंड विश्वास असतो. ही बाब केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि दत्ता मेघे यांच्या बाबतीत प्रकर्षाने दिसते. दत्ता मेघे आणि नितीन गडकरी यांची मैत्री अनोखी होती. माजी खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी आपल्या मृत्युपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव टाकले आहे. खुद्द मेघे यांनी ही माहिती १९ ऑक्टोबर २०२१ रोजी वर्धा येथे आयोजित जाहीर कार्यक्रमात दिली. "सर्व पक्षांशी मी चांगले संबंध प्रस्थापित केले. नितीन गडकरी आमच्या फॅमिलीचे महत्वाचे नेते आहेत. मी माझ्या मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये म्हणून त्यांचे नाव दिले आहे', असे मेघे यांनी तेव्हा सांगितले होते.

असा मोठ्या मनाचा नेता होणे नाहीः गडकरी यांची मेघे यांना आदरांजली

नागपूर -ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री आणि माझ्या ज्येष्ठ बंधूंसारखे असलेले दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. दत्ताभाऊंच्या जाण्याने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली. दातृत्व अंगी असलेला असा मोठ्या आणि निर्मळ मनाचा नेता पुन्हा होणे नाही या शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे. विदर्भातील शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील दत्ताभाऊंचे योगदान उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. गडचिरोलीपासून मेळघाटपर्यंत आदिवासी भागात दत्ताभाऊंनी मोफत वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांचे आरोग्य सुधारण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले. सावंगी मेघे येथे त्यांनी गरिबांसाठी मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले. विदर्भातील तरुणांना उच्चशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मोठी संधी उपलब्ध करून दिली. माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात आणि पुढेही वैचारिक विरोधक असूनही दत्ताभाऊंनी कायम मला प्रेम-जिव्हाळा दिला व मार्गदर्शन केले. लहान बंधू प्रमाणे त्यांनी नेहमीच माझ्यावर प्रेम केले. प्रकृती अस्वास्थ्य असूनही विदर्भातील ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करण्याची त्यांची तळमळ कायम होती. त्यांचे सर्वसमावेशी नेतृत्व राजकीय कार्यकर्त्यांसाठी आदर्श होते असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

गरिबांना मदत करणारे ‘ दाताभाऊ‘ गेले : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर - आयुष्यभर जोपासलेल्या सेवाभावी आणि दातृत्वाच्या वृत्तीने सामान्य माणसाच्या मनात कमालीचा आदर आणि श्रद्धा निर्माण करणारे ज्येष्ठ भाजपा नेते आणि माझे मार्गदर्शक दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

दत्ताभाऊ प्रदीर्घ काळ राजकारणात होते. त्यांनी खासदार, आमदार, मंत्री अशी अनेक सन्माननीय पदे भूषविली. राजकारण आणि सत्तेच्या माध्यमातून गरीब, सामान्य माणसाचे कल्याण केले पाहिजे, हे संस्कार त्यांनी आम्हा सर्वांना दिले. शाळा तसेच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. त्यांनी असंख्य गरीब मुलांना निःशुल्क शिक्षण दिले. गरीब मुला- मुलींचे लग्न लावून दिले. गरिबांचे संसार उभारले.

दत्ताभाऊंनी त्यांच्याकडे आलेल्या गरजू माणसाला कधीच रिकाम्या हाताने परत पाठविले नाही. त्यांच्या दारात आलेला प्रत्येक दुःखी माणूस आनंद घेऊनच परत गेला. शिक्षणासाठी, वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी आयुष्यभर गरिबांना सढळ हाताने मदत केली. त्यामुळेच त्यांना सर्वजण श्रद्धेने ‘ दाताभाऊ‘ म्हणायचे याकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष वेधले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!