MB NEWS- *नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग समस्यांबाबत खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी घेतली रेल्वेमंत्री श्री.अश्विनीकुमार वैष्णव यांची भेट*

 *नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग समस्यांबाबत खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी घेतली  रेल्वेमंत्री श्री.अश्विनीकुमार वैष्णव यांची भेट*



नवी दिल्ली......

       रेल्वे मंत्रालयाची जवाबदारी सांभाळणारे नवनियुक्त केंद्रीयमंत्री श्री.अश्विनीकुमार वैष्णव यांची आज बीडच्या खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी दिल्लीत भेट घेतली. 

     नगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील समस्यांबाबत खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी यावेळी त्यांना माहिती दिली.प्रकल्पासाठी आवश्यक राज्य सरकारच्या वाट्याचा निधी मिळत नसल्यामुळे रेल्वेमार्गाच्या कामावर होणाऱ्या विपरीत परिणामाची चर्चा देखील याप्रसंगी केली.तसेच या प्रकल्पासंदर्भात रेल्वे विभागाची त्यांच्या स्तरावर बैठक घ्यावी व संबंधितांना सूचना कराव्यात अशी मागणी केली,यावेळी रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी संबंधितांना सूचना देणार असल्याचे सांगितले.या भेटीमुळे निश्चितच आपल्या रेल्वेमार्गाला गती मिळेल असा विश्वास खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी व्यक्त केला आहे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार