युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

पंडितगुरु पार्डिकर महाविद्यालयाची खेळाडू कू. निकिता म्हात्रे हिचे मॅरेथॉन स्पर्धेत यश

 पंडितगुरु पार्डिकर महाविद्यालयाची खेळाडू कू. निकिता म्हात्रे हिचे मॅरेथॉन स्पर्धेत यश



सिरसाळा (वार्ताहर):- येथील श्री पंडितगुरु पार्डिकर महाविद्यालयाची खेळाडू कू. निकिता म्हात्रे बि.ए (व्दितीय वर्ष) हिने सागर फाऊंडेशन सांगली संचलित "स्वराज्य " स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आयोजित मॅरेथॉन स्पर्धा आणि दक्षिण भारत जैन सभा वीर सेवा दल मध्यवर्ती समिति व शांतीसागर को- ऑप. क्रेडिट सोसा.ली. समडोळी यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय विराचार्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.

या दोन्ही स्पर्धेत महाविद्यालयाची विद्यार्थीनी तथा खेळाडू कू. निकिता म्हात्रे हिने अनुक्रमे *प्रथम आणि द्वितीय क्रमांक* पटकावला. तिच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष, मा. आ. व्यंकटराव कदम साहेब, सचिव, योगेश भैय्या कदम, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य डॉ के के पाटिल, क्रीडा संचालक, डॉ ए डी टेकाळे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख, डॉ विठ्ठल भोसले आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शूभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या