पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आवाहन

 पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्या गोपीनाथ गडावरील देवीच्या मंदिरात होमहवन पूजा



पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे आवाहन


परळी वैजनाथ।दिनांक २२।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या सोमवारी गोपीनाथ गडावर असलेल्या देवीच्या मंदिरात महानवमी निमित्त होमहवन व पूजा संपन्न होणार आहे, याप्रसंगी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असं आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलं आहे.


   गोपीनाथ गड येथे तूळजापूरची भवानी आई, कोल्हापूरची अंबाबाई आणि माहूरची रेणूकाई या तीनही देवीचे मंदिर पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकाराने उभारण्यात आले आहे. मंदिराचे दगडी बांधकाम  आकर्षक आहे.  दरवर्षी येथे नवरात्रोत्सव मोठया उत्साहात आणि थाटात साजरा केला जातो. शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त आश्विन शुध्द नवमी म्हणजे  सोमवार  २३ ऑक्टोबर रोजी गोपीनाथ गड (पांगरी) येथे देवीच्या मंदिरात सकाळी १० वा. पंकजाताई मुंडे  यांच्या हस्ते  विधियोक्त 

पूजा व होम हवन आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर महाआरती होणार आहे, याप्रसंगी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असं आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केलं आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार