इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी

 स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

● सभासदांना १०  टक्के लाभांश जाहीर●

ग्राहक व ठेवीदारांच्या विश्‍वासावर  वाटचाल -बाजीराव धर्माधिकारी


परळी वैजनाथ /प्रतिनिधी-दि.

          शहरातील बँकींग क्षेत्रात ग्राहक सेवेत तत्पर व बँकीग व्यवहारात विश्‍वासार्ह पतसंस्था म्हणुन असलेली ओळख कायम ठेवत पतसंस्थेने गेल्या आर्थिक वर्षात मार्च 2023 अखेर उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे.स्वा.वि.दा.सावरकर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक  सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली.

         

        संस्थेच्या कार्यालयात आज अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक  सर्वसाधारण सभा झाली. या वेळी आहवाल व ताळेबंद सभेत सादर करण्यात आला. सरत्या आर्थिक वर्षात 31 मार्च 2023 अखेर संस्थेची अर्थिकस्थिती पाहता संस्थेने उत्कृष्ट ताळेबंद निर्माण केला आहे. विषेश म्हणजे अल्पावधीतच पतसंस्थेतील ठेवी- 40 कोटी 76 लाख 91 हजार 232,भागभांडवल- 69लाख 57हजार 550 ,कर्ज- 32 कोटी 58 लाख 50 हजार 649,गुंतवणूक 13 कोटी 13 लाख 85 हजार 332,निव्वळ नफा 76 लाख 47 हजार 294 इतका आहे.


     पतसंस्थेच्या या प्रगतीशील वाटचालीत सर्व खातेदार, ठेवीदार,कर्जदार, हितचिंतक यांचा विश्‍वास हेच पाठबळ आहे असे अध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले.यावेळी संस्थेचे चेअरमन  बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना भारतरत्न डाॅ.ए.पी.जे. अब्दुल कलाम नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड मिळाल्याबद्दल सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सर्वसाधारण सभेला पतसंस्थेचे उपाध्यक्ष अनिल आष्टेकर,सचिव जितेंद्र नव्हाडे ,कोषाध्यक्ष रवि वळसे, संचालक श्रीकांत मांडे,राजाभाऊ मराठे, रंगनाथ सावजी, रवि मुळे,दशरथ होळकर, डॉ.सौ.श्रध्दा देशपांडे, सौ.पद्मश्री धर्माधिकारी  यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक किरण सावजी यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद, नित्यसंचय ठेव प्रतिनीधी यांच्या सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभा यशस्वी करण्यासाठी अश्विन बुरकुले,महेश घेवारे,राहुल सारस्वत,अजिंक्य कुलकर्णी,जालिंदर गिरी, शुभम काकडे,वंदना बनसोडे आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या